मनोरंजन

फिरत्या शौचालयांची चोरी 


तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची फिरती शौचालये चोरी करून ती पुन्हा नगर परिषदेलाच विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.नगरपरिषदेच्या फिरत्या शौचालयांची चोरी नगरपरिषदेचेच स्वच्छता विभागातील कर्मचारी करायचे आणि फिरते शौचालय चोरीला गेले म्हणून नवे शौचालय खरेदी करण्याची परवानगी घ्यायचे.पैसे घेऊन चोरलेलेच फिरते शौचालय पुन्हा नगरपरिषदेला विकायचे.एक शौचालयाची किंमत ९५ हजार.अशी जवळपास चौदा फिरत्या शौचालयांचा हा गैरव्यवहार अखेर उघडकीस आला.नागरपरिषदेचेच स्वच्छता विभागाचे कर्मचारी यात सामील होते.म्हणजे चक्क कुंपणच शेत खात होते.या सर्व कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली असून त्यांच्याकडून जवळपास चौदा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.