मतदान प्रक्रिया सुरळीत व द्यावयाची माहिती अचूक द्यावी — नायब तहसीलदार राम बोरगावकर

लोहा ( केशव पवार)
लोहा तालुक्यातील ७७ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज गुरुवारी तहसील कार्यालयात पार पडले.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे तसेच सोबतची माहिती अचूक नोंदवावी असे मार्गदर्शन नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले
लोहा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात। सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुक संदर्भात कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आज गुरुवारी पार पडले . तहसीलदार परळीकर, नायब तहसीलदार राम बोरगावकर, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार देवराये , अव्वल पेशकार बडवणे, निवडणूक विभागाचे प्रमुख तिरूपती मुंगरे, सहायक प्रशांतअपशेट्टे, ऑपरेटर सूर्यकांत पांचाळ, मलगे, प स चे संगणक प्रमुख गिरी यांसह कर्मचारी यांची उपस्थिती होती
नायब तहसीलदार बोरगावकर यांनी दुसऱ्या प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडताना निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे पालन करा तसेच सोबतची वेगवेगळी माहिती साठी जे फॉर्म दिलेले आहेत त्यात महिती अचूक भरून द्यावी असे सांगून कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरासरण केले
तहसीलदार परळीकर यांची विभागीय आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स होती बैठक संपल्यावर पुन्हा तहसीलदार परळीकर हे दुसऱ्या प्रशिक्षणाची सांगता केलीं .कर्मचाऱ्यांना
निवडणुकी बाबत माहिती दिली तसेच काळजीपूर्वक काम पार पाडावे असे मार्गदर्शन केले