पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच लाख पत्रे पाठवणार.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे;- राष्ट्रवादी युवक काँग्रेस

.परतूर/ एम एल कुरेशी.

परतुर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही मागणी धरत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाच लाख पत्र पाठविण्यात येणार असून, या मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक 10 जून रोजी पोस्टात पत्र टाकून परतूर येथून सुरवात करण्यात आला मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, याकडे केंद्र शासनाने लक्ष दिल्या शिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही, आज मराठा समाजाची परिस्थिती हलाखीची बनली आहे, या समाजातील युवक उच्च शिक्षित होऊन ही बेकार झाले आहेत, दोन वेळा आरक्षण देण्यात आले, युवकांनी संबंधित जातीची प्रमाणपत्र ही काढली मात्र दोन्ही वेळेस हि प्रमाणपत्र केवळ नावा पुरतीच ठरली, याचा कुठेच उपयोग झाला नाही, यामुळे मराठा समाज हवालदिल झालेला आहे, मराठा समाजाला आरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे, ही मागणी लावून धरत आज दिनांक 10 जून रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी या पत्रातून साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली पत्र पाठवण्याचा शुभारंभ परतूर येथून करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, ओमकार काटे राहुल आंबोरे, मनोज सोळंके, शिवा करपे, लक्ष्मण नागरे, गणेश काळे, कैलास मुळे, वैजनाथ गवळी, दिलीप म्हस्के, भागवत भगत, लक्ष्मण गायकवाड, इलियास शेख, विठ्ठल सुरूंग,संतोष साठे, यांच्यासह मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *