खट्टा मिठा:- लस’णीयालस’णीया


———————

———————
स्वामी रामदेव बाबा अ‍ॅलोपॅथीची लस घेताहेत,आहे की नाही धक्कादायक बातमी.त्याहून धक्कादायक म्हणजे ते सर्वाना लस घेण्याचं देखील आवाहन करताहेत.यालाच म्हणतात उंट पहाड के नीचे येणे.२१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर बाबांचे धाबे दणाणले.कारण विचारा.२१ जून ! राष्ट्रीय योग दिन !! म्हणजे मोदींनी विस्तव पार बाबांच्या बुडाखालीच आणून ठेवला.बाबाकडे पर्यायच नव्हता.त्यांनी छाटी गुंडाळली (आणि काय पहनले माहित नाही) पण बाबा मुद्दा सोडून पळाले हे तितकेच खरे.फटक्यात त्यांनी लस घेण्याची घोषणा केली.मोदींचा ‘लस’णीया कामी आला.बाबा तसे मोदींच्या गुडबुक मधली ओळखीची खूण.पण का कोणजाणे सध्या त्यांच्यातून म्हणे विस्तव जात नाही.म्हणजे मोदींनी एकवेळ मोराला जवळ केले पण या चोराला जवळ येऊ दिले नाही म्हणतात.थोडक्यात रामदेव बाबांनी मोदींचे ‘घी’ पण पाहीले आणि ‘बडगा’ पण पहिला.एकाच आयुष्यात असा अभूतपूर्व योगायोग अनुभवलेले दोनच व्यक्ती या हिंदुस्थानात हयात आहेत.एक लाल कृष्ण अडवाणी आणि दुसरे उदयोगगुरू स्वामी रामदेव बाबा.खरी बातमी शपथेवर सांगतो.त्यांचं कोरोनील दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही दस्तुरखुद्द नरेंद्र मोदींनी डुबवलं.नसतं डुबवलं तर कोरोनीलने मोदींना डुबवलं असतं.(शेवटी पाणी नाकातोंडात शिरायला लागल्यावर माकडीण सुद्धा पिलाला पायाखाली घेत नाही काय ?) मोदी चाललेही होते त्याच दिशेने.अगदी रामदास आठवले ‘गो कोरोना गो’म्हणाले त्या धर्तीवर कोरोना जेव्हा पाळण्यात खेळत होता तेव्हा मोदींनी कोरोना पळवायला घंटा बडवण्याचा आणि दिवे पाजळण्याचा बार्बीय उपाय सुचवला होता.पुढची पायरी रामदेव बाबांचे कोरोनीलच होती,नव्हे तशी तयारीही झाली होती.(उगाच नाही केंदीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी कोरोनीलचे लॉन्चिंग केले) पण बाबा चुकलेच.त्यांनी डॉ.हर्षवर्धन सोबत गडकरींनींनाही बोलावले आणि घोटाळा झाला.कोरोनीलचे तिथेच बारा वाजले.पण काही म्हणा मोदीजींचे चुकलेच.त्यांनी बाबांना चान्स द्यायला हवा होता.त्यांचं कोरोनील सगळ्या जगात विकलं असतं तरी मोदींना कोणीही काहीही म्हटलं नसतं.( आणि काय सांगावे,न जाणो या निमित्ताने जगातला सगळा काळापैसा भारतात आला असता.) आदर पूनावालाने काय दूध दिलं.त्याचा झाला धंदा आणि मोदींच्या वाट्याला काय तर करून सवरून बदनामी.जाऊद्या जे झाले ते झाले,पण रामदेव बाबा सुतासारखे सरळ झालेले पाहून आम्हाला मात्र सुखद धक्का बसला.काल परवापर्यंत मेडिकल सायन्सला मूर्ख विज्ञान, अ‍ॅलोपॅथी औषधांना विष आणि डॉक्टरांना राक्षस म्हणाऱ्या बाबांनी डॉक्टर देवाने पृथ्वीवर पाठवलेले देवदूत आहेत.अ‍ॅलोपॅथी औषधे संजीवनी आहेत आणि मेडिकल सायन्स खरे सज्ञान आहे असे म्हटले आहे.लकडी शिवाय माकडी वठणीवर आली याचा आम्हाला आनंद आहे.श्वास घ्या…श्वास सोडा…सुरुच ठेवा.कितना मिनट…तीन…तीन मिनीट…करो करो करो … 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *