मराठा क्रांती भवन उभारणीस संदीप बाहेकर यांच्या वतीने 21,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द. 

 परतूर/ एम एल कुरेशी.
मराठा क्रांती भवन उभारणीसाठी संदीप बाहेकर यांच्या वतीने 21,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे ,
त्यांचे शिव अभिनंदन , मराठा क्रांती भवन उभारणीला समाजातील जाणत्या आणि जाणीव असणाऱ्या समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणा मध्ये सातत्याने मदत होत आहे, आज स्वयंस्फूर्तपणे धनादेश प्राप्त झालादेणाऱ्याने देत जावे,
 घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे! स्वयंस्फूर्त पणे मराठा क्रांती भवन च्या कामाचा वेग आणि गुणवत्ता पाहता  धनादेश दिला, केवळ साक्षीदार नाही तर आपण भागीदारही झालो पाहिजे, ही भावना समाजातील जाणत्या घटकांमध्ये निर्माण झालेली पाहत असताना अभिमान वाटतो , आणि कामाला स्फूर्ती मिळते  पंचक्रोशीतील डॉक्टर, प्राध्यापक , वकील, शिक्षक, व्यापारी आणि राजकारणातील  समाज बांधव मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येत आहेत, आपल्याला अपेक्षित असणारे सभाग्रह, अभ्यासिका , वसतिगृह अतिशय दिमाखदार काही दिवसातच पाहायला मिळेल, समाजातील होतकरू गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणा साठी लागणारी पायाभूत उभारणी या माध्यमातून होत आहे, समाजातील जाणत्या,व जाणीव असणाऱ्या सर्वच घटकांना विनंती आहे की आपण प्रत्यक्ष कामाला भेट देऊन शहानिशा करून, या कामांमध्ये जास्तीत जास्त योगदान द्यावे. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असणारी मराठा क्रांती भवनाची वास्तू लवकरात लवकर नावा रूपाला येईल, उद्या_नाही_तर_आज मी त्याचा भागीदार झालो पाहिजे मी मी आज फुल ना फुलाची पाकळी मराठा क्रांती भवन साठी दिली पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असताना आमचा सर्वच समाज बांधवांचा उत्साह यामुळे द्विगुणित होत आहे  दात्यांचे पुनश्च आभार .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *