सातोना येथे दोन पिस्तुल जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईने खळबळ.

परतूर -दि ९- तालुक्यातील सातोना खु येथील इस्माकडून दोन गावठी पिस्तूलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईने परतुर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
   परतूर तालुका व पिस्तुल असा सिलसिला काही थांबायचे नाव घेत नाही, सातोना आष्टी रोडवर पिस्तुल रोखून कार पळवल्याची घटना ताजी असतांना ९ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने सातोना येथून दोन गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केल्याने तालुक्यातील पोलीस यंत्रणेवर ताण वाढलेला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिंचोली पुलावर झालेल्या दरोड्यांचा तपास करण्यासाठी सेलू ,मानवत,परतूर भागात तपास कामी फिरत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मौजे सातोना ता.परतुर येथील विष्णु आकात रा . सातोना ता.परतुर हा गावटी पिस्टल ( अग्निशस्त्र ) नेहमी कंबरेला बाळगुन काहीतरी घातपात करण्याचे इराद्याने परिसरात वावरत आहे अशी माहिती पथकाला मिळाली . त्यावरुन दिनांक 08/06/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विष्णु रामभाऊ आकात हा त्याचे राहते घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्याच्या घरी छापा टाकला व त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या गावटी पिस्टल बाबत विचारणा केली असता त्याने दोन गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा एकुण 50,000 / – रुपयांचा मुद्देमाल  काढुन दिला . आरोपी विष्णु रामभाऊ आकात रा.सातोना ता.परतुर याच्या विरुध्द पोलीस ठाणे परतुर येथे भारतीय हत्यार कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक विनायक देशमुख , अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग , स्थानिक गुन्हे शाखा जालना , श्री.शिवाजी नागवे , सहा.पोलीस निरीक्षक , पोहेकॉ सॅम्युअल कांबळे , प्रशांत देशमुख , गोकुळसिंग कायटे , विनोद गडधे , कृष्णा तंगे , सचिन चौधरी , प्रशांत लोखंडे , विलास चेके , किरण मोरे , महिला अंमलदार पुनम भट्ट यांनी केलेली आहे .
      गेल्या काही वर्षात तालुक्यात पिस्तुल ने झालेले दोन खून व पिस्तुल चा धाक दाखवून करण्यात आलेल्या घटना पहाता अवैध पिस्तुल चा वापर हा चिंतेचा विषय झालेला आहे .स्थानिक गुन्हे शाखा तालुक्यातील अनेक घटनेत तपास करत आरोपींना जेरबंद करत आहे.  मटका बुकीवर छापा टाकण्याचे काम ही स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला करावे लागत असल्याने स्थानिक पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान आरोपीला आज परतूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसासाठी एम सी आर दिल्याने आरोपीस हर्सुल काराग्रहात पाठवले आहे या घटनेचा तपास सहायक पोलीस निरिक्षक रविंद्र ठाकरे हे करीत आहे. अशी माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *