चिंचोली तालुका परतुर येथील शाळेच्या कम्पाऊंडची भिंत कोसळली गुत्तेदार एजंसीचे बोगस काम.

 परतूर/ एम एल कुरेशी.
 चिंचोली तालुका परतुर येथील शाळेच्या कंपाउंड वॉलचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने आज ही भिंत कोसळल्याने या भिंतीचे काम बोगस झाल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुनर्वसन व हस्तांतरण समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की या कम्पाऊंड वाॅलचे काम सुरवाती पासूनच थातूर मातूर प्रमाणात करण्यात आले होते, या कामाची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती,काम झाल्यानंतर चौकशीच्या वेळी डॉ. प्रदीप चव्हाण यांनी श्री सारडा, व श्री बागले, चौकशी अधिकारी. यांना चिंचोली येथील कंपाउंड वॉलचे काम बोगस झाल्या बद्दल प्रत्यक्ष काम दाखवून या भिंतीला तळे गेल्याचे व हे काम बोगस झाल्याचे सांगितले होते, काम अत्यंत निकृष्ट झालेले आहे परंतु त्यावेळी त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते, चिंचोली येथील शाळेची भिंत पडल्यामुळे हे काम बोगस झाल्याचे आता सिद्ध झाले आहे, तेव्हा सदरील काम ज्या एजन्सी ने केले, त्या एजंसीचे संरक्षण मूल्य (सेक्युरिटी डिपॉझिट) तात्काळ शासन जमा करून, त्या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात यावे, असे डॉ प्रदीप चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारयांना कळवले आहे, अनेक वेळा तक्रार केली, स्वतः अधिकाऱ्यांना सोबत घेऊन, अनेक गावांचा दौरा केला, त्यावेळी सदर भिंतीला तडे गेल्याचे दाखवले, व तेथूनच वरिष्ठ अधिकारयांना भ्रमणध्वनी वरून कल्पना दिली, पण काहीच कारवाई झाली नाही, शेवटी शाळेची भिंत पडली असून, पंचवीस लाख रुपयाचे हे काम तत्कालीन कलेक्टर श्री तुकाराम मुंडे यांच्या दौऱ्यात मंजूर करून घेण्यात आले होते, या सगळ्या प्रकाराची माहिती वरिष्ठांना दिली असून सात दिवसात संबंधितांच्या विरोधात कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरून याविरुद्ध आंदोलन करण्यात येईल, तसेच पत्रकार परिषद घेऊन लोअर दुधना प्रकल्पातील पुनर्वसित गावाबद्दल सर्व माहिती मांडण्यात येईल, असा इशारा डॉ. प्रदीप चव्हाण यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *