शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्परआमदार शिंदेपानशेवडी येथे शेतकऱ्यांशी साधला जनता संवाद


कंधार/ प्रतिनिधी
राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या हिताला पहिले प्राधान्य दिले.कर्जमाफी पीकविमा मंजूर करण्यात आला. जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन कंधार-लोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले.
 बुधवारी(दि.9जून रोजी  कंधार तालुक्यातील पानशेवडी येथे सीसी रोड, पाणंद रस्ता लोकार्पण व पाणीपुरवठा उद्घाटन प्रसंगी शिंदे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान मोरे, प्रमुख उपस्थिती समाजसेविका आशा शिंदे, माजी जिप सदस्य रावसाहेब शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर चोंडे, पानशेवडीचे सरपंच गेनूबाई चव्हाण, कचरूताई मोरे, अशोक कळकेकर, महम्मद अजीम बबर महम्मद, अवधूत पेठकर, शंकर डिघोळे, बालाजी देवकांबळे, प्रवीण मंगणाळे, डॉ फरजना,कोंडीबा मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शिंदे पुढे बोलताना म्हणाले आगामी काळात महिला सक्षमीकरनासाठी बचत गट मोठ्या संख्येने निर्माण करून ग्रामीण महिलांच्या कल्याणासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे ही ते म्हणाले. जिल्ह्यातील कंधार- लोहा मतदार संघात पीकविमा मंजूर करण्यात आला. मतदार संघात निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी आमदार शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *