आष्टी ग्रामपंचायत ला नगरपंचायतीच्या दर्जा द्या, नगरपंचायत साठी आष्टीकर सरसावले, सर्वपक्षीय संघर्ष समितीचे गठन,

परतुर/ एम एल कुरेशी.

 आष्टी ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा यासाठी आष्टी शहरातील सर्व पक्षी संघर्ष समिती गठित करण्यात आली आहे, आष्टी ग्रामपंचायतला नगर पंचायत मध्ये रुपांतर करण्यात यावे यासाठी संपुर्ण आष्टीकर एकवटले असून, यासंदर्भात आष्टी येथील प्रियदर्शनी इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक पार पडली, या बैठकीत सर्व संमतीने नगरपंचायत साठी पाठपुरावा करण्या करिता आष्टी संघर्ष समिती गठीत करण्यात आली आहे, परतूर तालुक्यात आष्टी ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, अंदाजे चाळीस-पन्नास खेळ्यांचा केंद्रबिंदू आष्टी गाव आहे, मोठी व्यापार पेठ आहे तर येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समीती आहे, तसेच आष्टी हे गाव परतूर पाथरी सेलू माजलगाव घनसावंगी च्या मध्यभागी आहे,  आष्टी हे गाव शेगाव पंढरपूर या महामार्गाशी जोडलेले असल्याने व या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्याने,येथे ग्रामीण रुग्णालय सुद्धा व्हावे, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे,आष्टी गाव नगरपंचायत दर्जाचे असताना आष्टीला नगरपंचायतीचा दर्जा न देता, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी या ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे, तिर्थपूरी पेक्षा आष्टी गाव फार मोठे आहे, येथील लोक संख्या देखील 30 हजाराच्या आसपास आहे, म्हणून आष्टी ग्रामपंचायतला सुद्धा नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, असा ठराव सर्व पक्षीय समीतीच्या वतीने यावेळी घेण्यात आला आहे,  या बैठकीस माजी पंस. सभापती मतदान लाल सिंगी. सुमंता पाटील,  हबीब शेख, गंगाधर सोळंके, राजेश पळसे, अन्सारी नसीर, फुलारी बाळासाहेब, जमीनदार मोहसीन, कुरेशी अलताफ, काकड असद खान, काकड नसरुल्ला खान, कल्याणकर इरफान, थोरात बळीराम, कुरेशी रईस, मुजीब शेख. आनंद अगलावे, आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.आष्टी ग्रामपंचायतचे  नगरग्रामपंचायत मध्ये रुपांतर व्हावे यासाठी शासनाकडे 2011पासून पाठपुरावा सुरू असून, अनेक वेळा निवेदने देण्यात आली आहे, मात्र या निवेदनाची काहीही दखल शासनाच्या वतीने घेण्यात आली नाही, तीर्थपुरी ला नगरपंचायतीचा दर्जा मिळाला यामुळे आष्टीकरांनी  पुन्हा एकदा संघटित होऊन लढा उभारण्याचा निर्धार केला आहे, असे उपसभापती रामप्रसाद थोरात यांनी सांगितले, आष्टी संघर्ष समिती मध्ये जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, उपसभापती रामप्रसाद थोरात, सरपंच जागीरदार सादेक, टेकाळे श्रीकृष्ण, दहिभाते अशोक, पठाण इस्माईल. भगवान कांबळे, खिस्ते शिवाजी, कुरेशी अब्दुल सत्तार, गांजाळे श्रीरंग. रहमत पठाण, दिलीप थोरात, आदींचा समावेश करण्यात आलेला आहे.अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य अ.सत्तार कुरेशी यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *