एसटी बस च्या खाजगी करणास विरोध, गरिबांच्या लालपरीला वाचविण्यासाठी राज्यभरात आंदोलन.अॅड. महेंद्र वेडेकर.

 परतूर/ एम एल कुरेशी.

एसटी परिवहण महामंडळाच्या खाजगी करण्यास विरोध करत गरिबांच्या लालपरीला वाचविण्या साठी राज्यभरात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने दि.7जून रोजी एकाच वेळेत काळे पट्ट्या बांधून आंदोलन करत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले, असे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे परतुर तालुकाध्यक्ष अॅड. महेंद्र वेडेकर यांनी सांगितले, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खाजगीकरण त्वरीत रद्द करण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने राज्यभर काळी किती लावून विरोध आंदोलन करण्यात आले, व  तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सर्वसामान्य जनतेच्या साठी ना नफा- ना तोटा, या तत्त्वावर सर्वसामान्य नागरिकांना सेवा देण्यासाठी स्थापन केलेले हे महामंडळ आहे, परंतू महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पूर्णपणे विक्री करण्याचा निर्धार शासन करीत असून त्याचा विरोध करण्यात येत आहे, महामंडळा मध्ये नव्याने येणाऱ्या खाजगी बसेस वापरण्यात येऊ नये, आज पर्यंत काही अंशी केलेले खाजगीकरण रद्द करावे, व पुढील खाजगीकरण त्वरित थांबवावे, महामंडळा मध्ये करार पद्धतीने अधिकाऱ्यांची भरती बंद करून, करार पद्धतीने भरती केलेल्या अधिकाऱ्यांना त्वरित नियमित करावे, कर्मचाऱ्यांना कोरोना काळात नियमित मासिक वेतन त्वरित अदा करण्यात यावे, कोरोना महामारीच्या काळात कर्तव्यावर असताना ज्या कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला, अशा कर्मचाऱ्यांच्या परिवाराला पाच कोटी रूपयाची रक्कम परिवारिक उदरनिर्वाह करण्यासाठी द्यावी, व परिवारातील एका व्यक्तीला त्वरित नोकरीत घ्यावे, कोरोना महामारी च्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 50 लाख रुपयांचा विमा त्वरित लागू करावा, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मधील आरक्षण लागू करून पदोन्नती वेळेवर दिली जावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे परतुर तालुका अध्यक्ष, अॅड महेंद्र वेडेकर यांनी दिली,  जालना जिल्ह्यात परतूर मध्ये  हे आंदोलन यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *