कोरोनाचा पार्दुभाव कमी होत आहे मात्र गाफिल राहुन चालणार नाही.नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधीकारी-

मोरे.परतुर / एम एल कुरेशी.


कोरोनाचा पार्दुभाव कमी होत आहे मात्र गाफिल राहुन चालणार नाही दक्षता बाळगण्याची आहे असेनवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधीकारी- श्री राजू मोरे यांनी परतूर पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगीतले. उपविभागीय पोलीस म्हणालेकीकोरोनाच्या सावटाखाली गेली चार महीने लॉकडाउनमध्ये अनेकांचे व्यापार अडचणीत आले, आता हळू-हळु कोरोनाची हि लाट कमी होत असल्याने,सर्व नागरीकांचे हित समोर ठेवत ,राज्य शासनाने अनलॉक मध्ये काही प्रमाणात अटी शर्तींवर सुट दिली आहे. मात्र याचा गैर फायदा उचलण्याचा कोणी प्रयत्न करू नये, कारण यात जर पुन्हा सर्वच जन गाफिलपणे वावरले तर तिस-या लाटेला आमत्रण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही असा ईशारा परतुर येथे नुकतेच उपविभागीय पो.अधिकारी पदावर रूजु झालेले. पोलीस अधीकारी श्री राजू मोरे यांनी दिला. दिनांक 7 जुन रोजी  बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी हितगुज व्हावी या दृशटीने बोलावण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत मोरे यांनी म्हटले की गेल्या चार महिन्याच्या प्रतिक्षे नंतर  अनलॉक मध्ये दुकाने उघडण्यास परवानगी प्रशासना कडुन मिळत आहे. मात्र याचा गैरफायदा घेउन पुन्हा रस्त्यावर कोरोना नियम डावलून वावरणे सार्व साठी घातकच ठरणार आहे. म्हणुन प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे सर्वनागरीकांनी पालन करणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. सार्वजनीक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे, क्षमतेपेक्षा जादा गोधंळ घालत खरेदी विक्री करणे, हा पण एक प्रकारे गुन्हा असुन, अशांवर कारवाईचा ईशारा त्यांनी यावेळी दिला. कोरोनाची लाट ओसरली असे समजुन बेजबाबदार पणे वावरू नका, मास्क,  तसेच नियमित सॅनीटायझरने हात स्वच्छ करत, स्वताहाची व कुटूंबाची काळजी घ्या, शेवटी असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. परूर विभागात पोलीस प्रशासनात काम करतांना परिसरात कुठलेही अवैध्य धंदे चालु देणार नाही, असे म्हणत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले, नागरिकांनी सार्वजनीक उत्सव साजरे करतांना, अगोदर परवाणगी घ्यावी, व दिलेल्या सुचने प्रमाणेच वागावे, विनाकारण कुणावर अन्याय होणार नाही अशी आपली मानसीकता आहे, मात्र शांतता व सुव्यवस्था भंग करणा-यांची अजिबात गय केली जाणार नसल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेत शहरातील पत्रकार बांधवांची उपस्थीती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *