क्रांतीसूर्य बिरसा मुंडांना माहूरकरांची श्रध्दांजली

.श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी  )

क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिना निमित्त भारतीय जनता पक्षाच्या अनूसूचित जमाती मोर्चाच्या वतीने दि.9 जून रोजी स.11वा. माहूर शहरातील बिरसा मुंडा चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत प.पु.कार्तिक भारती महाराज यांचे हस्ते  त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून पुजन करण्यात आले.         भाजपाचे युवानेते अॅड.रमण जायभाये,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर,शहराध्यक्ष गोपु महामुने, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान,नंदकुमार जोशी,प्रथम नगराध्यक्ष समर त्रिपाठी,महीला मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना राजू दराडे व पद्मजा गि-हे यांनी बिरसा मुंडा यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सुमित राठोड,वसंत कपाटे,शारदासूत खामणकर, अनिल वाघमारे,अपील बेलखोडे, अच्युत जोशी,ज्ञानेश्वर लाड,बंसगोपाल अग्रहारी,सुनील गुप्ता,राजू दराडे, आनंता हिंगाडे,रामकिसन केंद्रे,साईनाथ नागरगोजे,संतोष तामखाणे,संजय शेडमाके,माधव वाठोडकर,संजय बनसोड,मंगेश सोयाम,संदीप तोडसाम,राजू आड़े,सचिन शिरपूरकर आदींची उपस्थिती होती.प्रास्ताविक व सूत्रसंचलन एस.एस.पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संजय पेंदोर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *