परतूरला इंधन,गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन.

परतूर/ एम एल कुरेशी.

 मागील काही दिवसात डिझेल, पेट्रोल,गॅसच्या दरात लक्षणीय वाढ होत आहे, या दरवाढीचा प्रभाव सर्व सामान्य नागरीकांवर होत आहे, या दरवाढीचा परतूर कांग्रेसच्या वतीने निषेध करण्यासाठी सोमवारी परतूर शहरातील परतूर वाटूर मार्गावर साईनाथ कॉर्नर परिसरात असलेल्या संदीप ऑटोमोबाइल्स या पेट्रोल पंपावर पेट्रोल डिजल भरण्या करीता येणारया ग्राहकांना पेढा भरवून एक अनोखे आंदोलन करण्यात आले,मागील काही दिवसात इंधनाचे भाव गगनाला भिडले असल्याने यास मोदी  सरकार जबाबदार आहे, म्हणून प्रतीकात्मक पद्धतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना पेढा भरवण्यात आले, काॅग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते नितीन जेथलिया, यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले, यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबा गाडगे, जिप. सदस्य इंद्रजित धनवट, युवक तालुकाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, सचिन लिपणे, परविन डुकरे, बाबुराव हिवाळे, सिद्धार्थ बँड. उपनगराध्यक्ष सादेक खतीब, शाकेर मापेगावकर, अविनाश शहाणे, तारीख सिद्दिकी, विकास झरेकर, मोहसिन बागवान. आदी या वेळी उपस्थित होते,  अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला महागाईच्या खाईत टाकण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले, केंद्र सरकारने सुरुवातीला मोफत स्वयंपाकाचा गॅस देण्याचे आश्वासन दिले, मात्र आता गॅस सिलेंडर वरील सबसिडी बंद करण्यात आली आहे,  गॅसचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट ही कोलमडले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सर्वसामान्य जनतेच्या खिशावर हात घालून, भांडवलदारांचे पायघड्या घालण्याचे काम केंद्र सरकार करत आहे, असा आरोप यावेळी नितीन जेथलिया यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *