सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लसीकरण मोहीमेचा आढावा. 

सर्व नागरीकांनी लसीकरण करून घ्यावे (किर्तिकीरण पूजार )

माहूर (प्रतिनिधी)कोरोना महामारी या जिवघेन्या रोगापासून नागरीकांचा बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून ग्रामीण रुग्णालय माहूरसह तालूक्यात लसीकरण मोहिम व जनजागृती अभियान सुरु असून दि. 5जून 2021रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांनी ग्रामीण रुग्णालयासह। तालूक्यात सूरू असलेल्या लसीकरण मोहीमेचा आढावा घेतला. तसेच प्राणवायू (आॅक्सीजन)संच व प्राणवायू वाहीणीच्या कामाची पाहणी केली (आॅक्सीजन लाईन) लसीकरण मोहिमेच्या कामाबाबत किर्तिकीरण पूजार यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधून कोरोनापासून बचाव करण्यासाठी  लस ही अतिशय गुणकारी सूरक्षीत नवसंजीवनी आहे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करून घ्यावे असे सांगून तालूक्यातील सरपंचासोबत व्हीडीओ कॉंन्फरन्सिंव्दारे  बैठक घेऊन आपल्या गावात लसीकरण जनजागृती तसेच सर्व नागरीकांचे100 टक्के लसीकरण करून प्रशासनाला सहकार्य करावेअसे  सर्व जनतेला आवाहन केले, तसेच ग्रामीण रुग्णालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सूरु असलेल्या निवास व प्रसूती कक्षाच्या बांधकामाची पाहणी केली , यावेळी।तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर, डॉ. अभिजित अंबेकर,  वैद्यकीय अधीक्षक डॉ व्यंकटेश भोसले, तालूका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव भिसे, यांचेसह कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *