वाई बाजार येथे शिवस्वराज्य दिन’ उत्साहात व थाटात  साजरा.

 माहूर (प्रतिनिधी )राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून माहूर तालुक्यातील वाई बाजार  येथे  छञपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमी बांधवांनी  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व स्नान घालून पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले व  जय भवानी,जय शिवराय,जय जिजाऊ च्या जयघोष करीत  शिवस्वराज्य दिन उत्साहात व थाटात  साजरा केला.      या मंगलमय सोहळ्याला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,प्रशांत शिंदे, उदय नाईक,मुनवर खान, प्रमोद शिंदे,डॉ.अजय लुटे,बंडु कलाने,कार्तिक बेहेरे पाटील,सागर देवकर,बाळू चव्हाण,अमन पठान,राजू शिंदे,गजू केळकर,बबलु जाधव,आकाश सातव,राजू जाधव,शिवम कलाने,बालाजी राऊत यांचेसह असंख्य शिवप्रेमी नागरीक उपस्थित होते.                महाराष्ट्राच्या इतिहासात ६ जून या दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे. ६ जून १६७४ या मंगलमय दिनी शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक झाला आणि त्याच दिवशी राजे ‘छत्रपती’ झाले.याच शुभ दिनी  महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वाचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले.त्याचे प्रतिक म्हणून दरवर्षी ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याचा   राज्यशासनाने निर्णय घेतल्या नुसार  राज्यातील सर्वच ग्राम पंचायती,पंचायत समिती व जि.प.कार्यालयात तो  साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *