खरीप हंगामाची तयारी पूर्ण. तालुक्यात कापूस सोयाबीन मूगाची होणार पेरणी.

शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत.
 सध्या पावसाळा सुरू झाला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीला लागले आहेत, बळीराजाने पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे,परतूर सह जालना जिल्ह्यातील 6 लाख 32 हजार पंचेचाळीस हेक्टर पैकी सहा लाख 5 हजार हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी होणार आहे.मात्र अघ्याप शेतकरी पाऊस पाण्याचा अंदाज घेत आहेत, त्यानंतरच खरीपाची पेरणी करण्याची शक्यता वर्तावली जात आहे.  बळीराजा प्रमाणेच बी-बियाणे, व खते पुरविण्यासाठी देखील शासकीय यंत्रणा सज्ज झालेली दिसत आहे. जालना – दोन दिवसावर पावसाळा येऊन ठेपला आहे आणि बळीराजाने पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे .जालना जिल्ह्यातील 6 लाख 32 हजार पंचेचाळीस हेक्टरपैकी सहा लाख 5 हजार हेक्‍टर क्षेत्रावर विविध पिकांची पेरणी होणार आहे. बळीराजा प्रमाणेच बी-बियाणे आणि खते पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणादेखील सज्ज झाली आहे. बियाणांची मागणी संपुर्ण जिल्ह्यात

6 लाख पाच हजार सहाशे नव्वद हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित आहे. या क्षेत्रात पेरणी साठी लागणारे बियाणे – संकरित ज्वारी19, संकरित बाजरी 420 , मका सात हजार 341, तूर 2251, मूग 1243, उडीद 509, भुईमूग 390, संकरित सूर्यफूल दीड क्विंटल, तीळ 4, सोयाबीन 21 हजार 69, तर कापूस 11 लाख 53 हजार 755 क्विंटल.खताचा साठा मंजूर
परतूरसह जिल्ह्यासाठी एकूण 2 लाख 1 हजार 210 एवढा मेट्रिक टन खत पुरवठा मंजूर झालेला आहे. त्यापैकी आतापर्यंत 71 हजार 352 मेट्रिक टन खताची विक्री झालेली आहे, भरारी पथकाची नेमणूकमागील वर्ष जालना जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं व बनावट खतांचा मोठा रॅकेट उघडकीस आला होता.  मात्र यावेळी कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात छापे मारून बोगस बियाणे आणि बनावट खते जप्त केली आहेत. त्यामुळे आता या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे.  तरी देखील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद आणि कृषी विभाग यांच्या माध्यमातून विविध भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके विविध दुकानांची तपासणी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही शंका आली तर त्यांनी कृषी विभागाशी थेट संपर्क साधावा. आणी छापील किंमतीपेक्षा जास्त दर मागितल्यास त्या दुकानदाराची तक्रार नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *