सावित्रीबाई महीला मंच व अखिल भारतीय माळी महीला आघाडीच्या संयुक्त  विद्यमाने वाई बाजारला वृक्षारोपन

.
 माहुर (प्रतिनिधी )माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे 5 जून रोजी   जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाईं महीला विचार मंच व अखिल भारतीय माळी महीला आघाडीचे वतीने ग्रामदेवता असलेल्या गोमाता मंदिराच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.      पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे,समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करून   पर्यावरण विषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू होय. होणारी बेसुमार  वृक्षतोड, वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यातून जागतिक तापमान वाढीसारख्या समस्या उद्भवल्या  आहेत.त्यावर नियंत्रण  करण्यासाठी वृक्ष लागवड करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी समाजात जनजागृती होण्याच्या दृष्टीने साविञीमाई महिला विचार मंच व अ.भा.माळी महिला अघाडीच्या सयुक्त संघटनेकडून वाई बाजारचे  ग्रामदैवत असलेल्या गोमाता मंदीराच्या प्रांगणात विविध जातीच्या झाडाची लागवड करण्यात आली. या उपक्रमात  भावना गवळी, दिव्या खराटे, आदिती साेनूले, शाेभाबाई सातव, स्नेहल साेनूले, वैशाली गवळी, भाग्यश्री जाेगदंड, प्राची खराटे, पुनम खराटे, अमृता खराटे आदिंनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *