परतुर लायन्स क्लबच्या वतीने वृक्षारोपण

. परतूर/ एम एल कुरेशी.

 जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लायन्स क्लबच्या वतीने परतूर येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्‍मीबाई सवने, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार रूपा चित्रक, गट विकास अधिकारी अंकुश गुंजकर, मुख्य अधिकारी सुधीर गवळी, सामाजिक वनीकरणाच्या मनीषा मदर्गे,  शिवाजी सवने, लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, उपाध्यक्ष राहुल सातोनकर, संदीप दाभाडे, गुणवंत पिंपळे, बबनराव उन्मुखे, संजीवनी खालापुरे, शालिनीताई पिंपळे, आदींची या वेळी उपस्थिती होती,  पिंपळाचे, कडूलिंबाचे, चिंचाचे व जांभूळचे अशा दीर्घायुषी व प्राणवायू मोठ्या प्रमाणात देणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले, या कार्यक्रमात मान्यवरांनी  आपल्या मनोगतात लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मनोहर खालापुरे यांनी केले, आपल्या प्रस्ताविकात खालापूरे यांनी सांगितले की, आजवर लायन्स क्लब परतूरच्या वतीने तालुक्यातील विविध सामाजिक बांधिलकी, व गरजेचे उपक्रम यशस्वीपणे राबवून दाखवले आहेत, मागील पाच वर्षात फक्त वृक्षारोपणच न करता त्या झाडांचे पूर्णवेळ काळजी घेण्याचे कार्य केल्यामुळे, शहरात आज पर्यंत लावलेली 150/ ते 200  झाडे मोठी झाली आहेत, यावेळी व्यंकटधाम समशानभूमीत दोनशेच्यावर झाडे लावण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप दाभाडे यांनी केले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *