जागतीक पर्यावरण दिवस साजरा.

परतुर/ एम एल कुरेशी. 

जगात जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो, या मागील उद्देश इतकाच की, जगातील प्रत्येक माणसां मध्ये पर्यावरणा विषयी जनजागृती निर्माण करणे, संपुर्ण  गावातून युवक-युवती, महिला बचत गट, स्वयंसेवक, याच्या मदतीने वाटुर सर्कल मधील गावात पर्यावरण अठवाडा साजरा करण्यात येणार आहे.  आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटुर यांच्या वतीने  गावातील स्वंयसेवकांच्या मदतीने, गावातील मोकळे मैदान, शेती बांधांवर, गाव- रस्ते, स्मशानभुमी, शाळा परीसरात या ठिकाणी वृक्षरोपन  करण्यात येणार आहे. वाटुर ता.परतूर सर्कल मध्ये जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करता येऊ शकेल, प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करूण वाढते काबन डाॅय ऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल, हवामानातील बदल लक्षात घेता, शितगृहातुन निघणारे क्लोरोफ्लुर कार्बन वायुचे प्रमाण कमी करणे आवशयक आहे, अधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटुरच्या वतीने पर्यावरण विषक जनजागृती करण्यासाठी गावात महिला बचत गट, युवक-युवती गट, शेतकरी गट, यांच्या वतीने शारीरीक अंतर ठेऊन कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले, वैज्ञनिक परिभाषे- त वनस्पती अथवा सजीव याना जगण्या योग्य आणि त्याची वाढ होण्या योग्य वातावरण ज्या परीसरात आहे त्या परिसरातील हवा जमीन पाऊस पाणी तापमान आदि गोष्टींना पर्यावरण म्हणतात, या कार्यक्रमासाठी अधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटुर अध्यक्ष एकनाथ राऊत,  गणेश राऊत, नागनाथ राऊत, रामचंद्र मोरे, दिनेश बच्छीरे, नितीन पाटोळे, विलास पाटोळे, पवन अजनकर, संजय अजनकर, सुमित कुपटकर, राजेश राउत, सुरेश बच्छीरे, आकाश आढे, हर्ष दोनवढे, मुन्ना शेख, आली शेख, आदि उपस्थीत होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *