बोगस बियाणाचा माहुर तालुक्यात शिरकाव. बोगस बियाणाचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता.

श्रीक्षेञ माहुर -(प्रतिनिधी)
 खरीप हंगाम जवळ आला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांची लघबग सुरू झाली आहे. माहुर तालुक्यात सर्वात जास्त पेरा हा सोयाबिन व कापाशी  पिकाचा आहे. याचा फायदा घेवून काही नफेखोर दुकान धारक सोयाबीन व कपाशीचे बोगस बियाणे विक्री करण्याच्या तयारीत आहेत. लगतच असलेल्या तेंलगाना प्रदेशा मधून सदर बियाणे आयात केले जात असून या बियाण्यांचा बाजारपेठेत शिरकाव झाल्याची धक्कादायक माहिती काही शेतकर्‍याच्या चर्चे मधून समोर आली  आहे. या बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. या गंभीर बाबीकडे माहुर कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
यावर्षी मानसूनचे आगमन लवकरच होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे शेतकन्यांची पेरणीची लघबग सुरू झाली आहे. पेरणीपूर्व शेतीचे सर्व कामे आटोपली असून कोरोना संकटातही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव केली आहे. यावर्षी सोयाबीन व कपाशी पिकापासून चांगले उत्पन्न व्हावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र त्यांच्या या अपेक्षेवर पाणी फेरण्याची तयारी काही नफेखोर व्यापारी तयारी करीत असल्याचे वृत्त आहे. तेंलगाना प्रदेशातून आयात केलेले सोयाबीन व कपाशीचे बोगस बियाणे विक्रीसाठी बाजारपेठेत उतरविल्या जात आहे. या बियाण्यांची अव्वाच्या सव्वा भावात विक्री करून मोठी माया जमविण्याची योजना माहुर तालुक्यातील काही कृषी संचालक आखित असल्याची माहिती आहे.
घरचेच सोयाबिन बियाणे वापरा बाहेरून बियाणे खरेदी करू नका, खरेदी केल्यास त्याची खात्री करून घ्या, असे आवाहन कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना वारंवार करीत आहेत.आवाहनाचा हा सोपस्कार दरवर्षी पार पाडल्या जातो. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे पेरलेले बी उगवलेच नसल्याची ओरड दरवर्षी होते. यावरून  माहुर तालुक्यात बोगस बियाण्याची विक्री होत असल्याचे अधोरेखीत होते. यावर्षी सुद्धा हा प्रयोग होणार असल्याचे संकेत आहेत. महाबिजने नाकारलेला सोयाबीनचा माल काही व्यापारी खरेदी करून तो तालुक्यात विक्री करीत असून तेलंगाना प्रदेशात त्यावर प्रक्रिया करून बोगस बियाणे बनविले जात आहेत. तोच माल माहुर तालुक्यासह इतर तेलंगाना सिमेवर असलेल्या बाजारपेठेत उतरविला जात असून लवकरच त्याची विक्री सुरू होणार असल्याचे समजते. या गंभीर बाबीकडे वेळीच कृषी विभागाने लक्ष घालून या सोयाबीन व कपाशी बियाण्यांच्या गोरखधंद्याला आळा घालावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
शेतकऱ्यांनी खात्री करुनच सोयाबीन व कापाशी बियाण्यांची खरेदी करावी.शक्यतोवर आपल्या घरचेच सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे.बोगस बियाण्याची विक्री करणार्‍यावर कडक कारवाई केली जाईल. बियाणे खरेदी करतांना शेतकर्‍यांनी बॅगचा टॅगखात्री करुन घ्यावा.तालुक्यात बोगस बियाण्यांची विक्री होत असल्यास त्याची त्वरीत तक्रार करावी.तालुक्यातील प्रत्येक कृषी दुकानातील बियाण्याचे आम्ही नमुने घेत आहोत, आम्हास बोगस बियाणे अडळून आल्यास आम्ही कायदेशीर कार्यवाही करु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *