आष्टी गावात भुमीगत गटार योजनेचे कामासाठी  4/5 महिण्या पासून खड्डे खोदून ठेवले, परंतू अघ्याप  काम करण्याचा पत्ता नाही.


परतूर/ एम एल कुरेशी.

आष्टी शहरातील भुमीगत गटार योजनेचे कामासाठी  4/5 महिण्या पासून खड्डे खोदून ठेवलेत, परंतू अघ्याप  काम करण्याचा पत्ता नाही.
शासन, प्रशासन,अधिकारी, लोक प्रतिनिधी,गुत्तेदार गावाचा विकास करीत आहे की विनाश, गावातील भुमीगत गटार योजनेच्या कामा साठी  4/5 महिण्या पासून मोठमोठे खड्डे खोदून ठेवले आहेत, परंतू अघ्याप  काम झाले नसल्याने, यामुख्य रस्त्यावरून येणारे जाणारे लोक,महिला भगिणीं रात्र-बेरात्र खड्ड्यात पडून जखमी होत आहेत, वाहनांचे  येणे जाणे सुद्धा बंद झालेले आहे,हा काही आड रानातील पांदानीचा रस्ता नसून शहरातील मुख्य रस्ता आहे, याच मुख्य मार्गावर अठवाडी बाजार आहे, मात्र प्रशासकीय अधिकारी, मुग गिडून गप्प आहेत, ग्राम पंचायत सरपंच-सदस्य, ग्रामसेवक झोपेचे सोंग घेत आहेत का? अशी भयानक अवस्था परतूर तालुक्यातील आष्टी येथील शहराची झाली आहे, माजी मंत्री लोणीकर यांचा आष्टी गाव ग्रह विभाग आहे, राहूल लोणीकर येथून रिकार्ड मताने जिल्हा परिषद मध्ये निवडून आलेले आहेत, या भुमीगत गटार गंगेचे काम ताबडतोब  करण्याची येथील नागरीकांची  मागणी आहे, नसता या संदर्भात परतूर तहसील कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा येथील नागरीकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *