कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आंबा परतूर येथे मुलींना मोफत प्रवेश

.परतूर/ एम एल कुरेशी. 

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, आंबा परतूर येथे मुलींना मोफत प्रवेश देण्यात येत असून, सन. 2021-22 या शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देणे सुरू आहे. सर्व आजी-माजी  विद्यार्थीनीना तसेच सर्व आदरणीय पालकांना कळविण्यात येते की, देशभर  कोरोना मुळे लाॅक डाऊन आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे आम्ही सर्व आपल्या घरापर्यंत येऊ शकत नाही. म्हणून एक नम्र विनंती आपल्या  शाळेत इयत्ता 6 वी ते 8 वी मध्ये शिकत असलेल्या शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी  प्रवेशीत विद्यार्थिनींना प्रवेश देणे सुरू आहे.प्रवेशाचे निकष पुढील प्रमाणे आहेत.
शाळाबाह्य,अनाथ,एक पालक,विधवा/ घटस्फोटीत /परित्यक्ता यांचे पाल्य,शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब, प्रकल्पग्रस्त,गावातील शाळेत पुढील वर्ग नाही,वरील प्रमाणे प्रवेश निकष राहतील .वसतिगृहाची वैशिष्टये असे आहेत 
 प्रशस्त इमारत आहे तसेच मुलींना राहण्याची उत्तम सोय आहे, मुलींसाठी स्वतंत्र गादी, कॉट नि सर्व निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे,तसेच या शाळेत विद्यार्थिनी साठी उत्तम भोजन व्यवस्था आहे,सर्वांगीण विकासा साठी विविध उपक्रम, राबविले जातात, मुलींची नियमित आरोग्य तपासणी केली जाते, संबधित शाळेशी भेट देऊन गुणवत्ता तपासणी करावी,तरी आपल्या परिसरात ,शाळेत , गावात,वस्तीवर, इत्यादी ठिकाणी वरील प्रमाणे निकष पात्र SC, ST, VJNT, OBC  प्रवर्गाच्या विद्यार्थिनी असतील तर संपर्क करावा तथा सोबतच्या लिंक वरती माहिती भरुन  विद्यार्थ्यींनीला प्रवेशासाठी मदत करावे असे आवाहन श्री.म. साळवे जे बी. मुख्याध्यापिका. श्री म.नारायणकर डी. आर.श्री.लहाने एम. ए. (लेखापाल)माहिती भरण्याकरीता लिंक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *