माजलगाव, दि.08 : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दि.1 फेब्रुवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्याचे ऊस बिलाचा पहिला हप्ता बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. यात 795 शेतकऱ्यांच्या खात्यात 10 कोटी 70 लाख 38 हजार 196 रु. वर्ग करण्यात आले असून शेतकर्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन, कारखान्याचे व्ह.चेअरमन मोहन जगताप यांनी दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 मध्ये आज अखेर एकूण गाळप 3 लाख 35 हजार मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच कारखान्याने दि.25 ऑक्टोंबर 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंतच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 1900 रु.प्रति टना प्रमाणे या अगोदर शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. माजलगाव तालुक्यातील तसेच कार्यक्षेत्रातील इतर कारखान्यापेक्षा गाळप क्षमता व विविध पदार्थाचे कोणतेही प्रकल्प नसताना माजी आमदार तथा चेअरमन श्री बाजीराव सोनाजीराव जगताप यांनी शेतकऱ्यांचे हित जपत ऊस बिलाचा पहिला हप्ता काढला आहे. तसेच कारखान्याचे दि.1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 या दरम्यान 56 हजार 335.893 मे. टन उसाचे गाळप झालेले असून यामध्ये एकूण 795 शेतकऱ्यांचे ऊस बिलाचा पहिला हप्ता 1900 रू. प्रति मे.टना प्रमाणे एकूण रु.10 कोटी 70 लाख 38 हजार 196 रुपये बँकेत वर्ग केले आहेत. उर्वरित राहिलेल्या ऊस बिलाच्या राक्कमेचे टप्या- टप्प्याने लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे व्हा.चेअरमन मोहनराव जगताप यांनी सांगितले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक महेश सगरे, सचिव चंद्रकुमार शेंडगे उपस्थित होते. तरी सर्व शेतकऱ्यांनी विभागीय शेतकी कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित बँकेत बिल जमा करून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
