स्थानिक ग्रा.पं प्रशासनाची बघ्याची भुभिका.

श्रीक्षेञ माहुर -(शहर प्रतिनिधी) नांदेड जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटणकर यांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात। कोरोना प्रतिबंधक उपाययोजना (ब्रेक द चैन) नियमावली लागू केली असली तरी माहुर तालुक्यातील वाई बाजार ग्राम पंचायत प्रशासनाने नेहमी प्रमाणे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना (ब्रेक द चैन) नियमांचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसवून दि.५ व ६ एप्रील रोजी अत्यावश्यक दुकानासह अनेक दुकाने उघडल्याने ब्रेक दी चेन नियमावलीचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार दिलेल्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायतप्रशासनासह संबंधीत विभागाने याबाबत बघ्याची भूमिका घेतली असून राज्यातील वाढता कोरोना लक्षात घेऊन ठाकरे सरकारने कोरोना प्रतिबंधक उपाय योजना (ब्रेक दि चैन) मोहीम राबविण्याचा निर्णय
दि.५ एप्रिल रोजी नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय जाहीर केला तशा प्रकारच्या सूचना नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांनी देखील प्रसार माध्यमांद्वारे सर्व जनतेस कळविल्या आहे.

वास्तविक पाहता कोरोना प्रतिबंधक उपाय योजना (ब्रेक दी चेन) नियमावली बाबातची माहीती स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ध्वनिकक्षेपकाव्दारे नागरीक, व व्यापाऱ्यांना देउन जिल्हाधिकार्याच्या आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी करणे अनिवार्य असतांना याकडे ग्रामपंचाय प्रशासनाने जाणीवपूर्वक टाळाटाळ केली कसल्याची चर्चा ग्रामस्थांनमध्ये ऐकावयास मिळत आहे.
वाईबाजार ही तालूक्यातील मोठी बाजारपेठ असून मुख्य बाजारपेठेतील जवळपास सर्व दुकाने सुरू असल्याचे दिसून आले.अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे परंतु बंदी घालण्यात आलेली प्रतिष्ठाने (दुकाने) सुरू ठेवण्यात आलीअसल्याची माहीती सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि भालचंद्र तिडके यांना कळताच त्यांनीआपल्या सहकाऱ्यांसह बंदी घालण्यात आलेली प्रतिष्ठान भरलेला बाजार हटविला व बाजारपेठेतील स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरून आलेल्या भाजी विक्रेत्यांना नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.

ब्रेक दी चेन नियमावलीची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असतांना स्थानिक ग्राभपंचायत प्रशासन मात्र उंटावर बसून शेळ्या हाकतअसल्याची चर्चा वाई बाजार परिसरात ऐकावयास मिळत होती एकंदरीत या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होत असल्याची बाब नित्याचीच झाली असून .याबाबत सूज्ञ नागरीकांनी संबधीत विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या परंतू वरीष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी सोबत वरीष्ठ अधिकार्‍यांचे काही अर्थपूर्ण संबंध आहेत की काय ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *