*—आरेफ खैरूल्ला खान *

माजलगांव( प्रतिनिधी)शहरातील करोडो रूपयाचे टेंडर एका कंपनीला नगर परिषद प्रशासनाने दिले आहे.त्यात स्थानिक लोकांना प्राधान्य देयचे सोडून बाहेरगावचे लोक आणून साफसफाईचे काम करून घेत आहे.त्या मध्ये ६५ते ७०वयोगटातील वयोवृद्ध लोक ह्या टेंडरवाल्याने घेतले आहे.त्याच वयोवृद्ध लोकांची खाण्यापाण्यावाचून हाल होत आहेत.ते लेबर एकजोडीला केवळ ४००रू .मध्ये कामाला लावले असून चक्क स्वताच्या पोटावर मलिदा लाटून खाण्याचा प्रकार समोर आला आहे.सबंधित मजूरांना विचारले असता जोडीमध्ये ४००रु.देतात व खाणे पिणे त्याच ४००रू.आम्हाला करावे लागत आहे.मूळ मूद्दा जो आहे.आधि स्थानिकलोकांना प्राधान्य देयचे तर हा मड्यावरचे लोणी खाणारा ठेकेदार बाहेरगावच्या लोकांना प्राधान्य देतो.लाखो रूपयांचा काळाबाजार लेबर मागे करण्यात येतौ. येथील नगर परिषद प्रशासन मूग गीळून गप्प आहे.१२० मजूरांची आवशयकता असताना केवळ तटपूंज्या मजूरावरच काम उरकण्याचे धाडस हा टेंडरवाला (आदिलशहा)असल्यासारखे वागत आहे.जर वेळीच ह्या ठेकेदाराने स्थानिक मजूरांना प्राधान्य ते पण मागेल त्याला काम दिले नाही तर नगरपरिषद प्रशासना समोर अंदोलन करू असा इशारा इमेल द्वारे दक्षता समितीचे सदस्य आरेफ खैरूल्ला खान यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *