२२ कोटी ८२ लक्ष रुपयाच्या रस्ते विकासा कामाला दिली मंजुरी.

माहुर प्रतिनिधी(माहूर प्रतिनिधी) किनवट माहूर मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार भिमराव केराम यांनी रस्ते विकास कामाच्या संदर्भाने जानेवारी महिन्यात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन किनवट माहूर तालुक्यातील रस्ते सुधारण्यासाठी निधीची मान्यता व अधिकच्या रस्ते कामांना मंजुरी देण्याची आग्रही मागणी केली होती.आमदार केराम यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून नामदार गडकरी यांनी किनवट तालुक्यातील चार व माहूर तालुक्यातील एक अशा पद्धतीने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाच कामासाठी २२ कोटी ८२ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे.सत्तेत नसताना ही येवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात आमदार केराम यांना यश मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आमदार भीमराव केराम यांनी मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आभार मानले आहे.

माहूर आणि किनवट तालुक्यातील आदिवासी,अति दुर्गम डोंगराळ, बंजारा बहुल खेडे,पाडे,वाडी व तांड्या मध्ये चांगल्या रस्त्यांचा आभाव निर्माण झालाअसून खेडेपाड्यात राहणाऱ्या लोकांना आरोग्य व इतर कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्या येण्त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.अशा परिस्थितीत चांगले रस्ते निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याची बाब लक्षात घेऊन किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी राज्यात आपली सत्ता नसताना देखील रस्ते विकास कामे हाती घेण्याचा दृढनिश्चय केला.मतदार। संघातील गोरगरीब जनतेचे रस्तयाविणा होत असलेल्या हाल अपेष्टा नजरेसमोर ठेऊन समोर रस्ते विकासाची समस्या घेऊन दि.५ जानेवारी रोजी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे माहूर आणि किनवट तालुक्यातील रस्त्याची झालेली दयनीय अवस्थेचा पाढा वाचला आणि एक विस्तीर्ण निवेदन देऊन रस्ते विकास कामासाठी निधीची मागणी केली. सदर रस्त्यांच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्याची आग्रही मागणी केली होती.या मागणीचा सकारात्मक विचार करून नामदार नितीन गडकरी यांनी माहूर आणि किनवट तालुक्यामधील रस्ते विकास कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील इस्लापूर – कोल्हारी – हुडी – इस्लापूर ३ कोटी ९६ लक्ष,इस्लापूर – पांगरी – भिसी ४ कोटी ५९ लक्ष, मांडवी – लिंगी तांडा – लिंगी ३ कोटी ९६ लक्ष, कनकी – मिनकी – तलाईगुडा ५ कोटी ७१ लक्ष आणि माहूर तालुक्यातील अंजनखेड – नाईकवाडी – सावरखेड ४ कोटी ६० लक्ष रुपये इतक्या निधीची तरतूद करून त्यास मान्यता दिली आहे.लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असून आमदार भीमराव केराम यांची नामदार गडकरी यांच्यासोबत झालेली भेट खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याची सुख:द चर्चा ऐकायला मिळत आहे.नामदार नितिन गडकरी यांनी आमदार केराम यांनी दिलेल्या निवेदनाला अवघ्या काही महिन्यातच मूर्तरूप दिल्याने आमदार केराम यांनी मतदार संघातील जनतेच्या वतीने नामदार गडकरी यांचे आभार व्यक्त केले आहे.व यापुढेही किनवट विधानसभा मतदार संघाचा विकास साध्य करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *