माहूर (शहर प्रतिनिधी)

श्रीरेणूका देवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या उंबरझरा कूंडापाशी सायंकाळी सात वाजताचे सुमारास भीषण आग लागली ही आग वेगाने पसरत मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या दूकानापर्यंत पोचली हि बाब तेवील व्यापारी प्रतिनिधी तथा यूवासेनेचे तालुकाध्यक्ष विकास कपाटे यांच्या लक्षात येताच त्यांनी नगर .पंचायतीचे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांना भ्रमणध्वनीद्वारे माहीती दिली असता स्वामी यांनी विनाविलंब अग्निशमनची गाडी घटनास्थळी पाठविल्याने पूढील अनर्थ टळला, ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतादूत गणेश जाधव, चालक अविनाश रुणवाल, जोतिबा खडसे,

यांनी अथक परिश्रम घेतले, या आगीची भीषणता एवढी होती की अग्निशमनची गाडी पोचण्यास थोडासा जरी उशीर झाला असता तर मंदीराच्या पायथ्याशी असलेली दुकाने जळून खाक झाली असती व मंदिरही क्षतिग्रस्त झाले असते. अग्निशमनची गाडी घटनास्थळी पाठविल्याने व्यापाऱ्यांची दुकाने,, व मंदिर सूरक्षीत राहीले,यापुर्वी देखी लागलेल्या आगीमुळे पायथ्याशी असलेली सर्व दुकाने जळून खाक झाली होती नगर पंचायततीने विनाविलंब अग्निशमनची गाडी घटनास्थळी पाठविल्याने पूढील अनर्थ टळला केलेल्या सहकार्याबद्दल व्यापारी संघटनेने नगर पंचायतचे आभार मानले,गेल्या पंधरा दिवसापासून रामगडकिल्ला, रेणूका मंदीर, दत्तशिखर, अनूसयामंदीर, वसमतकर मठ, वजरा शेखफरीद आनमाळ, गूंडवळ परीसरात आग धुमसत असून या आगीमध्ये मौल्यवान वस्तू सागवान झाडासह उपयोगी वनस्पती, पुरातत्व खात्याने करोडो रुपये खर्च करून रामगड किल्याची दूरुस्ती केली परंतू आजूबाजूच्या परिसरात लागलेल्या आगीने रायगडाच्या भिंतीला तडे गेले असून कूंभकर्णी झोपेत असलेला वन विभाग मात्र या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे,वास्तविक पाहता जंगलाला लागलेली आग आटोक्यात आणण्याची जबाबदारी ही वनविभागाची आहे परंतू आग विझवण्यासाठी वनविभाकडे अद्यावत यंत्रणा उपलब्ध नसून केवळ संबधीत खात्याचे मंत्री अधिकारी यांच्या दौऱ्यावेळी कडक खाकीवर्दीत कर्तव्य तत्परतेचा देखावा निर्माणकरणारा वनविभाग वनसंपत्तीच रक्षण करण्याकामी एवढी उदासिन असण्याच कारण काय असा प्रश्न वनप्रेमींना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *