माजलगाव दि.( प्रतिनिधी ) तालुक्यातील किट्टीआडगाव प्रा.आ.के.अंतर्गत मंगरुळ क्र.१ आरोग्य उपकेंद्रात सरपंच प्रदीप घाटुळ यांच्या हस्ते कोवीड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला या लसीकरणाला ४५वर्षावरील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असुन काल एका दिवसात तब्बल १०० लोकांना लस देण्यात आली.
कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने व आरोग्य विभागाकडून ४५ वर्षावरिल सर्व नागरिकांना कोवीड लस देण्यासाठी आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कोवीड लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली आहे काल ५ एप्रिल सोमवारी रोजी तालुक्यातील मंगरुळ क्र.१ उपकेंद्रात कोवीड लसीकरणाचा शुभारंभ झाला आरोग्य विभागाच्या सि.एच.ओ.डॉ.रोहीणी टाकणखार, उपकेंद्राच्या ए.एन.एम.श्रीमती वाघमारे ए.एस,जाधव एम.पी.डब्लीव, यांनी केलेल्या आवहानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला असुन तब्बल १०० नागरिकांना लस देण्यात आली.या लसीकरण मोहीमेसाठी ए.एन.एम.अनिता पवार, पांडुरंग होके आरोग्य सेवक, आशा वर्कर उषा औसे,कोमल लांबुड,पार्टटाईम तुळजाई शेटे यांनी परिश्रम घेतले असून कोवीड लस केंद्राअंतर्गतील सर्व नागरिकांनी घेवुन कोरोनाला रोखण्याचे काम करुन आरोग्य खात्यास सहकार्य करावे असे आवाहन सि.एच.ओ.रोहीणी मॅडम सह परिचारीका वाघमारे ए.एस.यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *