माजलगांव /प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षापासून माजलगांव येथे आठवड्यातील एक दिवस मोफत रूग्णसेवा देत, समाजातील गोरगरीब रूग्णांना मोठा दिलासा देणार्‍या आणि शहरातील अन्य वैद्यकीय व्यवसायिकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेल्या डॉ.प्रकाशराव खोडसकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या वर्धापनदिनी भाजपाच्या माजलगांव तालुका शाखेकडून यथोचित गौरव करण्यात आला. डॉ.खोडसकर यांनी गेल्या वर्षभरातील कोरोना कालावधीत विशेष रूग्णसेवेचा वसा घेत कै.वि.मा.खोडसकर गुरूजी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हजारो रूग्णांना मोफत आरोग्य सेवा दिली. त्या अनुषंगाने त्यांच्यासह शहरातील प्रतिथयश डॉक्टर आणि भाजपाचे जुणे-जाणते निष्ठावंत कार्यकर्ते डॉ.प्रकाशराव आनंदगांवकर, भगवानराव चौधरी यांचाही भाजपा तालुका शाखा माजलगांवच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. डॉ.प्रकाशराव आनंदगावकरांनी कोरोना कालावधीत सतत तीन महिने शहरातील कोणत्याही रूग्णांकडून फीस न घेता मोफत रूग्णसेवा दिली तर श्री भगवानराव चौधरी यांनी भाजपाच्या स्थापनेपासूनच पक्षाशी एकनिष्ष्ठ राहून माजलगांव विधानसभा मतदारसंघात पक्षाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात शीर्षस्थानाची भूमिका बजासलेली आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या अनुषंगाने तालुकाध्यक्ष अरूण राऊत यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, भाजपाचे माजलगांव तालुकाध्यक्ष अरूणराव राऊत यांनी माजलगांव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच भाजपाच्या जुण्या-जाणत्या कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणत, भाजपाला समाजाभिमुख करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचा प्रयत्य नुकताच आला.
६ एप्रिल १९८० रोजी भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. त्याला आज ४१ वर्षाचा काळ लोटतो आहे. भारतीय जनता पार्टीची चार दशकाची कारकिर्द उजागर करण्याच्या निमित्ताने भाजपानेते रमेशराव आडसकर यांच्या निवासस्थानी भाजपा वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि भारतमातेच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित पक्षनेत्यांनी भाजपाच्या गेल्या चार दशकाचा प्रवास विशद केला.
कोरोनाच्या काळात कुठल्याही प्रकारची फीस न घेता तीन महिने मोफत रुग्णांची सेवा करणारे माजलगाव तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व प्रथितयश डॉ.प्रकाशराव आनंदगावकर व डॉ .प्रकाशराव खोडसकर यांनी कोरूनाच्या संकट काळी ५००० हजार पेशंटची मोफत तपासणी केली व भारतीय जनता पार्टी चे पहिले माजी तालुका अध्यक्ष भगवानराव चौधरी सर यांचीही सत्कार करण्यात आला व महाराष्ट्र सरकारने माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील अण्णासाहेब जगताप यांना महाराष्ट्र सरकार शेतीनिष्ठ पुरस्कार व राष्ट्रीय टेनिस, व्हॉलीबॉल स्पर्धा महाराष्ट्र संघाचे माजलगाव तालुक्यातील खेळाडू प्रमोद कोरडे, शुभम फंदे, वैष्णवी कोरडे, पुनम काळे, साध्वी सोनटक्के यांनी चांगली कामगिरी केली महाराष्ट्राला स्वर्ण आणि रौपे पदक मिळवून दिले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे महात्मा ज्यो. फुले प्राथमिक विद्यालयाचे क्रीडाशिक्षक शेख.के.जी व फंदे जे. व्हि या सर्वांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने वर्धापन दिना निमित्त माजलगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.Image

यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुणराव राऊत व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव बबनराव सोळंके, डॉ भागवतराव सरवदे, माजी नगराध्यक्ष डॉ.अशोकराव तिडके, भाजपचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर मेंडके, बबनराव सिरसट, नगरसेवक विनायक रत्नपारखी, लतीफ नाईक, दत्ता महाजन, नतुतात्या साळुंखे, मंचक गायकवाड, राहुल शिंदे, विकास गोरे, उमेश जाधव, माजी सरपंच रामेश्वर कोरडे, अर्जन पायघन, छबन घाडगे, राम शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमश्वर दहिवाळ व आभार प्रदर्शन नायक रत्नपारखी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *