माहूर (शहर प्रतिनिधी)

6एप्रिल। 1980 रोजी भारतिय जनता पक्षाची स्थापना झाली त्यास आज 41वर्षे पूर्ण झाले,भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष। पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडत पक्षाला परम वैभव प्राप्त करून दिले असून भारतिय जनता पक्षाच्या आदेशानुसार 6एप्रिल2021रोजी 41वा स्थापनादीन भारतिय जनता पक्षाच्या कार्यालयात तालूका अध्यक्ष अॅड.दिनेश येवूतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी ता. अध्यक्ष यानी आपले मनोगत व्यक्त केले.स्वर्गीय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी प्रथम अध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडत निःस्वार्थ कार्य करत 1980साली लावलेल्या रोप्टयाचे वटव्रुक्षात रुपांतर केले आज घडीला नरेंद्र मोदी यांच्या नेत्रुत्वात केंद्रात स्पष्ट बहुमताचे सरकार स्थापन झालेअसून भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू आहे. हे केवळ कै. पंडीत दीनदयाल उपाध्याय,दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी,पंतप्रथान नरेंदभाई। मोदी ,ग्रुहमंत्री अमितशाहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांंनी निःस्वार्थपणे योगदान दिलयामूळेच शक्य झाले .कारकर्यांनी त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून पक्षकार्य करावे असे मत व्यक्त केले, जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी हारडप येथील जेष्ट कार्यकर्ते तथा लोककलावंत कै. प्रभाकर बळीराम राठोड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी तालूका अध्यक्ष देवकूमार पाटील,तालुका सरचिटणीस अच्युत जोशी, निळकंठ मस्के, महीला मोर्चाच्या शहराध्यक्षा अर्चनाताई दराडे,राजू दराडे, कैलास फड,सागर। राठोड,, क्रिष्णा जायभाये, संजय पेंदोर, सोनू तोडसाम अविनाश भोयर, तामखाने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *