ग्रा.प.कडून वीज बिलाचा भरणा

आ.बाळापूर (प्रतिनिधी)
गेल्या दहा दिवसापासून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे निर्जळी लाभलेल्या आ.बाळापूर वासीयांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आ.बाळापूर वासीयकडे असलेला थकीत कर आणि पाणीपुरवठ्याचे आलेलं वीज बिल याच्या कोंडीत सापडलेल्या ग्रा.प.प्रशासन बंद असलेला पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न करीत होते ,60 लक्ष रु वीज बिल पैकी 30 लक्ष रु भरून सुद्धा वीज वितरण कंपनी ने वीज पुरवठा खंडित केला होता ,त्या मुळे आ.बाळापूर शहराला 25 गाव मोरवाडी पाणी पुरवठा योजने अंतर्गत असलेला पाणी पुरवठा गेल्या 10 दिवसापासून बंद करण्यात आला होता . शेवटी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या अधीक्षक अभियंत्याशी चर्चा करून संबधीत कार्यालयाला 5 लक्ष रु.चा आज दि 6 रोजी वीज 5 लक्ष रु वीज बिल भरण्यात आले तर उर्वरित रक्कम ही 20 एप्रिल,5 मे,20 मे,आणि 5 जून या प्रत्येक तारखेला 6 लक्ष रुपयांचा असा सर्व मिळून तीस लक्ष रुपयांचा वीज बिल ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहे . अनेक हात पंप नादुरुस्त अवस्थेत आहेत तर नळाला पाणी सुद्धा नाही त्यामुळे आ.बाळापूर वासीयांचे पाण्याविना हाल झाले होते. एक दोन दिवसात सर्व पाणी पुरवठा सुरळीत होईल असे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *