जिल्ह्याची डीलरशीप आ.बाळापुरात
आ.बाळापूर (प्रतिनिधी) आखाडा बाळापूर परिसरसह वारंगा,डोंगरकडा,बोल्डा, येहळेगाव परिसरातही गुटखा विक्री जोरात चालू असून पान टपरी सह छोट्या मोठ्या किराणा दुकांनातही गुटख्याचे विविध प्रकार विक्री होताना दिसत आहेत. खर्रा, मटेरियल वर पोलिसांचा थोडा फार अंकुश लागला असताना गुटखा मात्र आपली तेजी कायम ठेऊन आहे . विमल,गोवा,वजीर,आर एम डी ,या सह राजनिवास गुटखा सर्रास विकल्या जात आहे. गुटखा किंग हे विविध ठिकाणी आपले अड्डे बदलून गुटख्याची साठवणूक करित आसल्याची माहिती आहे.अन्न व औषध प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे ,या प्रशासनाची कुठलीही भेट अथवा कारवाही अद्याप पर्यंत तरी पहावयास मिळाली नाही.पोलीस सुध्दा या सर्व बाबीकडे दुर्लक्ष का करीत असावेत असा प्रश्न पडलेला आहे. सध्या एक प्रसिद्ध व बाजारपेठेत जास्त प्रमाणात विक्री होत असलेल्या गुटख्याची हिंगोली जिल्ह्याची डीलरशीप आ.बाळापुरात असून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात आ. बाळापुरातून ह्या गुटख्याची विक्री होत आहे . गुटख्याची साठवणूक ही परिसरातील खेडे गावात केल्याची माहिती मिळात आहे .लॉकडाउन च्या काळात गुटख्याला मात्र सुगीचे दिवस आले असून संबंधीत प्रशासन या कडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच बोलल्या जात आहे.