नियमांच उल्लंघन करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करणार.
भालचंद्र तिडके.
माहूर (शहर प्रतिनिधी)
दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनसह विविध उपाययोजना केल्या असून सध्या करोना महामारीने रौद्र रूप धारण केले आहे. जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनणकर यांनी दिनांक 5एप्रिल। 2021चेमध्यरात्रीपासून 30एप्रिल 2021पर्यंत रात्री आठ ते सकाळी सात यावेळेत संचारबंदी लागू केली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिषठाने बंद राहणारअसल्याचे आदेशीत केले त्यानुसार सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सूजान नागरीक, व्यापारी, दुकानदार, फळ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांनी कोरोना प्रतिबधात्मक नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात कोरोना महामारीने रौद्ररूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे व्यापाऱ्यांनी स्वता:हासह आपल्या दुकानातील कामगारांना मास्क लावने,सूरक्षीत अंतर राखणे,दूकानाच्या दर्शनी भागात हात धुण्यासाठी पाणी, सायन, सनिटायझरची व्यवस्था करावी, 45वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या कामगारांची कोरोना चाचणी व लसीकरण करून घ्यावे, विनामास्क ग्राहकांना दुकानात प्रवेश देउ नये तसेच रात्री आठ ते सकाळी सात यावेळेत संचार बंदी लागू असल्याने पाचपेक्षा जास्त नागरीकांनी एकत्र जमू नये,संचारबंदीकाळात बाहेर फिरतांना आढळून आल्यास 1000 एक हजार रूपये दंड विना मास्क व्यक्तीला 500 पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल नियमांचे उल्लंघन करणार्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,रितसर परवानगी घेतल्याशिवाय लग्न,समारंभ,कोनत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये सदर कालावधीत आठवडी बाजार बंद राहणार आहे ,नागरीकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे काटेकोरपणे पालन करीत आपल्या परिसरातील सदस्यांना व आजूबाजूच्या नागरीकांना कोरोना संसर्ग होणार नाही याची दक्षता घेउन प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी केले आहे.