माहुर(शहर प्रतिनिधी) –
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी माहूर येथे पुन्हा कोविंड केअर सेंटर चालू करण्यात आले परंतु येथे प्राथमिक उपचारा व्यतिरिक्त इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पूरेसे बेड, आॅक्सीजन, ईंजक्षन,पीण्याचे पाणी, आंघोळीसाठी पुरेसे पाणी नसल्याने रुग्णांना अडीअडचणीचा सामना करावा लागतो हि अडचण लक्षात घेऊन माहुर येथील कोवीड केअर सेंटरमध्ये सर्व सोईसूविधा उपलब्ध करुन द्याव्या तसेच तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड केअर सेंटरची निर्मिती करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमूख जोतीबा यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कडे केली आहे.
आदिवासी बहुल माहूर तालुक्यातील डोंगर दऱ्यात वास्तव्यास असलेल्या गोर गरीब शेतमजूर नागरिकांना कोरोना महामारीपासून आपले संरक्षण करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.त्यात वेळ व पैसा व्यर्थ वाया जातो, तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड केअर सेंटरची निर्मीती करणे गरजेचे झाले असुन शहरी भागापासून ते ग्रामीण भागात कोरोना विषानूचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोनाची लागन झालेल्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी आता कोविड सेंटरची निर्मीती करणे गरजेचेआहे. दीड लाखावर लोकसंख्या असलेल्या माहुर तालुक्‍यात केवळ माहूर येथे कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे परंतु याठिकाणी इंजेक्शन, ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णांवर केवळ प्राथमिक स्वरुपाचाच उपचार केला जात असल्याने गंभीर रूग्णांना नाईलाजास्तव उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल व्हावे लागत असल्याने सामान्य रूग्णांना त्याचा खर्च झेपावनारा नाही म्हणून तालूक्यातील जील्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोणा केअर सेंटर निर्माण करावे यासाठी मी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कडे मागणी करणार असल्याचे जोतीबा खराटे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. पुरेसे बेड कमतरता असल्याने केवळ येथे प्राथमिक स्वरूपाचाच उपचार केला जात असल्याने गंभीर रुग्णांना खाजगी दवाखान्याचा खर्च झेपावणारा नसल्याने माहूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर अध्यावत कोविड सेंटर ची उभारणी करण्यासाठी मी पालक मंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *