माहूर खंडणी प्रकरणाचे ईरावार कनेक्शन सीबीआय तपास व्हायला हवा

लोकपत्र विशेष /विजय आमले माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी कोणत्याही दबावाला भीक न घालता किनवट आणि माहूर मधील तथाकथित पत्रकार आणि मनसेचे कार्यकर्ते-पदाधिकारी म्हणवणाऱ्या सहा खंडणीखोरांना सरळ पोलिसांच्या ताब्यात देऊन एखाद्या अधिकाऱ्याने ठरवले तर तो समाजकंटकांना कसा चाप बसवू शकतो हे दाखवून दिले आहे.माहूर आणि किनवट तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा तसेच अन्य लहानमोठ्या नदीपात्रातून होणाऱ्या वाळू तस्करीला तसेच खडी,डब्बर,मुरूम,रेती आदी गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीला माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी बऱ्यापैकी आळा घातल्याचे बोलले जात आहे.त्यांनी अगदी जीवावर उदार होऊन अनेकवेळा स्वतः थेट स्पॉटवर जाऊन धाडी घातल्या,गौण खनिजांची अवैध वाहतूक करणारी वाहने मुद्देमालासह जप्त केली.अनेक वाळू तस्कर आणि माफियांवर कारवाई देखील केली.वरणगावकर यांच्या धडक मोहिमेमुळेzया धंद्यातील मजुरापासून मुख्य सूत्रधारापर्यंत अनेक जण दुखावले असण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार वरणगावकर यांचेवर राजकीय दबाव आणण्याचा तसेच धमक्या देण्याचाही प्रयत्न झाला .पण त्यांनी या प्रकारांना अजिबात भीक घातली नाही.त्यामुळे या धंद्यातील अनेकांची आवक-वरकमाई बंद झाली आहे.यातल्याच काहींनी आंदोलन,निवेदने करून वरणगावकर यांचे संदर्भात अफवा गैरसमज पसरवण्याचेही प्रयत्न केले.इतकेच नाही तर त्यांना एकट्याला गाठून पेपरबाजी,आंदोलने नको असतील तर एक लाख रुपये द्यावे लागतील अशी सरळ खंडणीची मागणी केली.वरणगावकर यांनी या संदर्भात नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार कानावर घातला.तशी तक्रार देखील दाखल केली .सुदैवाने सध्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि गैरप्रकार व गुन्हेगारावर वचक बसवण्याच्या बाबतीत स्वतःहून पुढाकार घेणारे असल्याने व कोणत्याही दबाव किंवा प्रभावाला अथवा हस्तक्षेपाला जुमानणारे नसल्याने या प्रकरणी तात्काळ कारवाई झाली आणि सापळा रचून खंडणीखोरांचे रॅकेट रंगेहात पकडण्यात आले.पकडण्यात आलेल्या सहा आरोपीवर भा.द.वि.३८४,३४ नुसार वजिराबाद पोलिसठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीना अटक देखील झाली आहे.सपोनि सुनील नाईक आता या प्रकरणाचा पुढील तपास आणि चौकशी करीत आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तीन पत्रकार आणि तीन राजकीय पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी असल्याने हा विषय अधिक चर्चेचा आणि गंभीर ठरला आहे.त्याच बरोबर तहसीलदार वरणगावकर यांच्या धैर्य,धाडस आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.पकडण्यात आलेल्या आरोपित गजानन  कुलकर्णी आणि कामारकर हे दोघे अकोल्याच्या ‘सायरन’ या दैनिकाचे किनवट आणि माहूर प्रतिनिधी आहेत.दुर्गादास राठोड हा ‘दैनिक गाववाला’चा प्रतिनिधी आहे.तर नितीन पोहरे, अंकुश भालेराव आणि राजकुमार स्वामी हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते-प्रतिनिधी आहेत.
——–अशी झाली सापळा कारवाई

माहूरचे मनसे तालुकाध्यक्ष गजानन प्रभाकर कुलकर्णी, किनवटचे तालुकाध्यक्ष नितीन गणेश पोहरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दुर्गादास राठोड, पत्रकार अंकुश भालेराव, राजकुमार नारायण स्वामी आणि कामारकर या सहा जणांनी तहसीलदारांना दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यातील पन्नास हजार रुपये त्यांनी वरणगावकर यांच्याकडून आधीच घेतले तर उर्वरित एक लाख रुपये २१ तारखेला रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देण्याचे ठरले.मनसेचे पदाधिकारी आणि पत्रकार खंडणी गोळा करायला येणार असल्याची फिर्याद दिलेली असल्याने पोलिसांनी सापळा रचला. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ते येताच वरणगावकर यांच्याकडून खंडणी स्वरुपात एक लाखांची रक्कम घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ यामध्ये कामारकर वगळता इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

—————
ईरावर कनेक्शनया खंडणीप्रकरणाशी नुकतीच आत्महत्त्या करून आयुष्य संपवलेले  किनवटचे मनसे शहर प्रमुख सुनील ईरावर यांचे काही कनेक्शन आहे काय अशीही दबक्या आवाजात चर्चा चालू आहे.१५ ऑगस्ट रोजी रात्री सुनील ईरावर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली.राजकारण आणि समाजकारण पैशाशिवाय होत नाही,आणि त्यासाठी लागणारा पैसा माझ्याकडे नाही.म्हणून मी स्वखुशीने जीवन संपवीत आहे.माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असे सुनीलने म्हटले होते.मात्र सुनील ज्या पक्षात आणि ज्या तालुक्यात होता त्याच तालुक्यातील मनसेचे तीन कार्यकर्ते आणि पदाधिकारी या खंडणीप्रकरणात आरोपी म्हणून पकडण्यात आले आहेत.खंडणीचे हा प्रकार पहिल्यांदाच घडला असेल असे म्हणता येत नाही.अशा स्थितीत पक्षातील सहकारी या मिळणाऱ्या वरकमाईची खबर सुनील ईरावरला लागू देत नव्हते का ? की सुनीलने त्याच्या सुसाईड नोट मध्ये नमूद केल्यानुसार तो अल्पसंख्याक भटक्या मागास जातीचा (मसणजोगी) असल्याने पक्षातल्या ‘उंचवर्णीय’गटाने त्याला एकटे आणि एकाकी पाडले होते.या बाबत वरिष्ठांकडून देखील दखल न घेतली गेल्याने सुनीलने विमनस्क होऊन नैराश्याच्या भरात आत्महत्त्येचे टोकाचे पाऊल उचलले.असे जर असेल तर सुनील ईरावारच्या आत्महत्त्येचे कनेक्शन या खंडणीप्रकरणाशी जुळते.या दोन्ही घटनांचा संलग्न तपास झाल्यास वेगळेच ‘सत्य’समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा तपास स्थानिक पोलिसांनीच करावा हे आमचे मत आहे.मात्र सुशांतसिंह राजपूत सारख्या कलावंताच्या आत्महत्त्येची चौकशी जर सीबीआय करीत असेल तर आमच्या सुनील ईरावरच्या आत्महत्त्येची देखील सीबीआय चौकशी व्हायला हवी.का नको ? न जाणो यातही बरेच काही राजकीय-सामाजिक गूढ रहस्ये दडलेली असू शकतात.मे बी… व्हाय नॉट ? 

7 thoughts on “माहूर खंडणी प्रकरणाचे ईरावार कनेक्शन सीबीआय तपास व्हायला हवा

  1. I needed to draft you one little bit of observation so as to say thank you once again for those great methods you’ve documented here. It is quite pretty generous of people like you to deliver freely exactly what a number of people could possibly have made available as an e book to end up making some cash for their own end, chiefly considering the fact that you could have done it if you considered necessary. The creative ideas additionally acted as the easy way to be certain that most people have a similar dream just like mine to find out a little more in regard to this condition. I’m certain there are lots of more enjoyable moments ahead for individuals that examine your blog.

  2. I am commenting to let you know of the fantastic encounter my cousin’s daughter experienced reading your site. She even learned many issues, not to mention what it’s like to have a wonderful giving mindset to have many people quite simply grasp chosen grueling subject areas. You really exceeded our expectations. Many thanks for giving the informative, healthy, educational and as well as easy thoughts on the topic to Jane.

  3. Thank you for every one of your labor on this web site. My daughter really loves making time for investigations and it’s really obvious why. Most people learn all regarding the lively mode you present reliable techniques through this web site and even inspire participation from some others on the point then our favorite princess is really starting to learn a whole lot. Take advantage of the rest of the year. You are always doing a splendid job.

  4. I’m just commenting to let you be aware of of the extraordinary discovery my cousin’s daughter enjoyed going through your site. She discovered lots of issues, most notably how it is like to have a very effective giving mindset to have many others just gain knowledge of certain extremely tough matters. You really did more than our desires. Many thanks for distributing the important, healthy, educational and as well as easy thoughts on the topic to Gloria.

  5. I am glad for writing to make you know what a incredible encounter my friend’s girl gained studying your web page. She learned plenty of pieces, which include what it’s like to possess an awesome helping mood to let other folks smoothly know just exactly several multifaceted subject matter. You truly exceeded our own expectations. Thank you for offering these necessary, safe, explanatory and even fun tips about this topic to Julie.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: