लोहा / प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या लोहा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत लोहा तालुक्यातील मतदारांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त करीत लोहा तालुक्यातील ५३ ग्राम पंचायती मध्ये शिवसेना,महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले असुन ५३ ग्राम पंचायतीमध्ये शिवसेना व महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे अशी माहिती शिवसेनेचे लोहा- कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोहा तालुक्यातील ८४ ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या यात ७ ग्राम पंचायतीच्या निवडणूका या अगोदरच बिनविरोध पार पडल्या तर ७७ ग्राम पंचायतीसाठी दि.१५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान झाले व त्यांचा निकाल दि. १८ रोजी लागला यात खांबेगाव, जोशी सांगवी,लोंढेसांगवी, धानोरा (म‌.) निळा,गोळेगाव प उ,पेनूर , आषटूर, गुंठेवाडी,कापसी ,कलंबर,गुंडेवाडी,कापसी,चितळी,किरोडा आदी २३ ग्राम पंचायती मध्ये शिवसेनेचे पॅनल निवडणूक आले आहे तर ३० ग्राम पंचायती मध्ये शिवसेनेचे मित्र पक्ष असलेले शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,यांचे ३० ग्राम पंचायती मध्ये पॅनल निवडणूक आले आहे.अशी माहिती शिवसेनेचे लोहा-कंधार चे नेते बाळासाहेब पाटील कराळे यांनी दिली.

तसेच वरील सदरील ग्राम पंचायतीला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही खा.हेमंत पाटील, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव , मुक्तेश्वर धोंडगे, जिल्हा प्रमुख आनंराव बोंढारकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे ही बाळासाहेब पाटील कराळे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय ढेपे, तालुकाप्रमुख संजय पाटील ढाले, संघटक स्वप्नील पाटील गारोळे , पं स. सदस्य उतम भाऊ चव्हाण,माजी तालुका प्रमुख सुरेश पाटील हिलाल, शहर प्रमुख मिलिंद पाटील पवार, किसान सेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर , माजी पं. स. सभापती पंडीत दे्कांबळे , कंधार शहर प्रमुख बाळू लुंगारे ,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *