परतूर/ एम एल कुरेशी.

 परतूर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दर्पण दिना निमित्ताने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, यावेळी भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस राहुल लोणीकर, यांच्यासह व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष.भगवानराव मोरे, ता.अध्यक्ष रमेश भापकर, शहराध्यक्ष सुधाकर सातोनकर, संदीप बाहेकर, प्रवीण सातोनकर, एॅड, जगन्नाथ बागल, प्रकाश चव्हाण, कृष्णा सांगूळे, दया.

काटे, पत्रकार अशिष गारकर, पत्रकार शेषराव वायाळ, यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती,    यावेळी इंग्रजांच्या राजवटीच्या विरोधात स्वातंत्र्यचळवळीत आपल्या लेखणीचा वापर करीत   स्वातंत्र्याच्या चळवळीत  पत्रकारांनी देखील आपली लेखणी द्वारे लढा दिला, व आजही समाज व्यवस्थेची विस्कटलेली घडी सुधारण्या करीता पत्रकार मोलाचा वाटा उचलत असल्याचे प्रतिपादन भगवान मोरे केले, काही दिवसापूर्वी कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य, व पोलिस विभागाचे जसे मोलाचे सहकार्य लाभले होते, तेवढेच मोलाचे सहकार्य पत्रकारांनी आपल्या लेखणीतून उचलत या काळात अभिनव कार्य केल्याचे राहूल लोणीकर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात  सांगितले, या कार्यक्रमात पत्रकारांच्या वतीने एम एल कुरेशी यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच संदीप बाहेकर, पत्रकार शेषेराव वायाळ  यांच्यासह मान्यवरांनी आपल्या मनोगतात पत्रकार यांच्या कार्याचा कौतुक केला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शिवनगिरीकर यांनी केले, तर प्रास्ताविक नगरसेवक कृष्णा अरगडे यांनी केले, आभार एॅड. जगन्नाथ बागल, यांनी मानले, यावेळी उपस्थित पत्रकारांचा सन्मान करण्यात आला, यावेळी भाजप कार्यकर्त्यांची  मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *