परतूर/ एम एल कुरेशी.

आज दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजे नंतर अंबा येथील नवोदय विद्यालयात परतूर तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीच्या मतदानाची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा परतूरच्या तहसीलदार रूपा चित्रक यांच्या नेतृत्वाखाली  सुरु करण्यात आली, 

या निवडणुकीत अपेक्षे प्रमाणे भाजपा प्रणित आघाड्यांनी वर्चस्व प्रस्थापित केले असून झालेल्या 38 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा प्रणित आघाड्यांनी 22 ग्रामपंचायती वर ताबा मिळवला आहे.तर राष्ट्रवादी कांग्रेस. कांग्रेस दुसरया स्थानावर राहिली बहुतेक ठिकाणी काट्याची लढती झाल्या  बहुचर्चित वाटूर अंबा आणि सातोना खु. या ग्रामपंचायतीच्या निकाला कडे सर्वांचे लक्ष लागले होते सातोना खु. ग्रामपंचायतीवर भाजपाच्या विलास आकात  यांनी ताबा मिळवला असून  15 पैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. अंबा आणि वाटूर येथे कांग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस ने वर्चस्व मिळवले अंबा येथे काटयाच्या लढतीत 11 पैकी 6 जागा राष्ट्रवादीआघाडीला तर 5 जागा भाजपा आघाडीला मिळाल्या, तर वाटूरला त्रिकोणीय लढतीत विद्यमान सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य बद्रीनारायण खवने यांच्या पैनलने 13 पैकी 9 जागा जिंकून  आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तसेच राष्ट्रवादी वादी कांग्रेसचे तालुका अध्यक्ष यांनी कारहाळा ग्रामपंचायतवर ताबा मिळवला आहे, तालुक्यातील सिंगोना लि.पिंपरी,वैजोळा,अकोली, परतवाडी, वलखेड, मावपाटोदा, सोयंजना, सिरसगाव, शेलगाव,नांद्रा रायपुर, डोल्हारा, बाबई, सावरगाव बु. सातोना खुर्द, ब्राह्मणवाडी, सुरुमगाव,आसनगाव, संकनपूरी, को.हदगाव,मसला, या गावात भाजपाने. तर हातडी पिंपळी धामणगाव, कारहाळा, लिंगसा, सोपारा वाहेगाव, हनवाडी गणेशपुर, अंगलगाव, वाहेगाव सातारा,आंबा, वाटुर, सातोना बु. पाटोदा माव, सावंगी गंगा किनारा, याठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीकाँग्रेस, आघाडीने बाजी मारली आहे मतमोजणी एकून 12 टेबलवर करण्यात आली यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती, आयपीएस पोलीस अधिकारी गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली  सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आली होती,  

यात फेरी क्रमांक 

1,सिंगोना, लिखित पिंप्री, वैजोडा व अकोली, 

2, डोलारा, बाबई, नांदरा,काऱ्हाळा 3, सावरगाव, सावंगी, पाटोदा माव, ब्राम्हण वाडी. 

4, हातडी,पांडेपोखरी,सुरुंमगाव व अंगलगाव. 

5, लिंगसा, रायपूर, सातारा वाहेगाव व सोयंजना. 

6, हनवडी गणेशपूर, माव पाटोदा, परतवाडी व वलखेड.

7, सिरसगाव,बानाचीवाडी, धामणगाव, सेलगाव. 

8, आसनगाव, ढोनवाडी, संकनपुरी, कोकाटे हदगाव, सातोना बु. 

9,सातोना खु,श्रीधर जवळा,

10 व्या फेरीत वाटूर,आंबा ,मसला व वाहेगाव सातारा.

अशी मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी  शांततेत पार पडली कोणती हीअनुचित घटना घडली नाही, 

एकूण 38 गावातील 43530 मतांची मोजणी करण्यात आली. 15 जानेवारी रोजी मतदान शांततेत पार पडल्यानंतर निकालाची उत्सुकता उमेदवार व त्यांच्या नेत्यांना होती. मतमोजणी साठी प्रशासनाने सर्व व्यवस्था चोख केली होती, पोलीस बंदोबस्त ही कडक ठेवण्यात आले होते.मतमोजणी परिसरात जास्त गर्दी व कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता  घेतली जात होती. 

निवडणूक निकालासाठी नवोदय विद्यालयाच्या सभागृह मध्ये रांगेत जाताना उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी छाया चित्रात दिसत आहे. 

तसेच निवडणूकीत विजय प्राप्त केल्यावर प्रसन्न अवस्थेत सभागृहा बाहेर येताना वाटूर तालुका परतूर येथिल विद्यमान सरपंच बद्रीनारायण खवने छाया चित्रात दिसत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *