अंबा-वाटूर- सातोना खु. ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष.

एकूण 10 फेऱ्यात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार.

 परतूर/ एम एल कुरेशी.

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज दि. 18 जानेवारी रोजी सोमवारी घोषित करण्यात येणार असून, आता निकाल काय? असेल याबाबत राजकीय वर्तुळासह संपूर्ण तालुक्यात प्रचंड उत्सुकता! आणि धाकधूक असल्याचे सध्या चित्र दिसत आहे, तालुक्‍यातील एकूण 38 गावातील ग्रामपंचायतीचे  कारभारी निवडण्या करीता 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले,एकूण 84. 09 टक्के मतदान पार पडले.एकूण 43 हजार 530, मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, यामध्ये 22 हजार 987 पुरुष, तर 20 हजार 543 महिला मतदारांचा समावेश आहे, मतदान शांततेत पार पडले असून, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, 

उद्या सोमवारी निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे, आता निकाल काय? असेल कोण? कोण पराभूत होईल! कोण विजय होईल, कुणाला किती? मते मिळतील, याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत असून, गावा-गावात जय-पराजयाचे मंथन सुरू झालेले आहेत,

सातोना खु ,वाटूर व आंबा या गावातील मतमोजणी कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सातोना खु. येथे भाजपचे विलासराव आकात, व राष्ट्रवादीचे महेश देवा, आकात. यांच्या पॅनल मध्ये प्रमुख लढत आहे, विलास आकात, यांचे पुतणे व स्व. बाबा साहेब आकात यांचे पुत्र कपील आकात, यांचा पाठिंबा येथे महेश आकात, यांना असल्याने, या चुलत्या पुतण्याच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या वेळी ही ग्रामपंचायत महेश देवा आकात यांच्याकडे होती, भाजपकडून यावेळी विलास आकात, असल्याने महेश आकात, यांच्यापुढे मोठे आव्हान उभे आहे. वाटूर निवडणुकीत बद्रीनाथ खवणे, यांची भूमिका प्रत्येक वेळी निर्णायक राहिलेली आहे, मात्र यावेळी त्यांचेच खंदे समर्थक राधाकृष्ण माने, यांनी स्वतंत्र पॅनल टाकून, त्यांना कडवे आव्हान उभे केले आहे. ही लढत चुरशीची होणार आहे. तर तिसरी महत्वाची ग्रामपंचायत आंबा मध्ये माजी सरपंच प्रशांत बोनगे, यांना नामदेव काळदाते पॅनलने जबरदस्त आव्हान उभे केले आहे, नामदेव काळदाते व रावसाहेब काळदाते हे पारंपरिक विरोधक! माजी सरपंच बोनगे यांच्या विरोधात एकत्र आल्याने निवडणूकीचा रंग-रूप बदलला आहे. या तीनही ग्रामपंचायतीत उलटफेर होण्याचे संकेत निवडणूक विश्लेशक व्यक्त करीत आहेत. नवोदय विद्यालयात होणाऱ्या मतमोजणी कडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आंबा येथे सकाळी 8 वाजल्या पासून  मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सुरक्षा व्यवस्था ही कडक करण्यात आल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

 एकूण 10 फेऱ्यात ही मोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी 12 टेबल असणार आहेत. फेरीक्रमांक 

1)सिंगोना, लिखित पिंप्री, वैजोडा व अकोली, 

2) डोलारा,बाबई, नांदरा,काऱ्हाळा. 3) सावरगाव, सावंगी, पाटोदा- माव, ब्राम्हणवाडी. 

4) हातडी,पांडेपोखरी,सुरुंमगाव व अंगलगाव. 

5) लिंगसा, रायपूर, सातारा वाहेगाव व सोयंजना. 

6, हनवडी गणेशपूर, माव- पाटोदा, परतवाडी व वलखेड. 

7) सिरसगाव,बानाचीवाडी, धामणगाव,  सेलगाव. 

8) आसनगाव, ढोनवाडी, संकनपुरी, कोकाटे हदगाव, सातोना बु. 

9) सातोना खु, श्रीधर जवळा.

10) व्या फेरीत वाटूर,आंबा ,मसला व वाहेगाव सातारा. अशी मत मोजणी करण्यात येणार आहे. तसेच

मतमोजणी साठी प्रशासनाने सर्व व्यवस्था चोख केली असून, पोलीस बंदोबस्त ही कडक असणार आहे. मतमोजणी परिसरात जास्त गर्दी व कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *