मास्तरड्यानो जरा जास्त काम केलेत तर मराल काय ?
——————————————————-
शाळेत पन्नास टक्के उपस्थितीला विरोध केल्यानंतर महाराष्ट्रातल्या मास्तरड्यानी आता सरकारने देऊ केलेल्या पाच दिवसांच्या दिवाळी सुटयांनाही विरोध केला आहे.सरकारने यांना १२ ते १६ नोव्हेंबर अशा पाच दिवसांच्या सुट्या देऊ केल्यात.यांना सालाबाद प्रमाणे संपूर्ण २१ दिवसांच्या सुट्या हव्या आहेत.कशासाठी ? नाही म्हणजे का म्हणून ? गेले सात-आठ महिने घरात आयते बसून खादाडताय ते कमी पडले काय ? नोकरी आणि पगार म्हणजे काय बापाची मत्ता आहे की पेंड.सरकार तुम्हाला शाळेतच जायला सांगतेय ना.ऑनलाईन शिकवायला सांगतेय.उपस्थिती पन्नास टक्के अनिवार्य आहे,म्हणजे पन्नास टक्के सुट्याच नाहीत का ? तुम्हाला पगार सगळा पाहिजे.त्यात कपात नको.वरतून महागाई भत्ते वगैरेही पाहिजेत.त्यातही कपात नको.मग शाळेत किमान पन्नास टक्के दिवस उपस्थित रहा,कामकाज करा (शिकवण्याचे) म्हटले तर तुमच्या पार्श्वभागात का दुखते ? ऑनलाईन शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही.हा प्रयोग पूर्णतः फसला हे तर आपल्याला विदित आहेच.नसेल तर आम्ही सांगतो.शालेय शिक्षण विभागाने कोरोना लॉक डाऊन काळात राज्यातील २ कोटी मुलांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ दिला गेला असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात फक्त ३० लाखांच्या आसपास म्हणजे केवळ १५.५२ टक्के विद्यार्थीच ऑनलाईन शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले ही धक्कादायक वस्तुस्थिती आहे.ऑनलाईन व्हाट्स अप,ऑफलाईन गृहभेटी,प्रश्नोत्तरे आणि स्वाध्याय पुस्तिकांच्या माध्यमातून किती उद्दिष्ट पूर्ण झाले.किती शिक्षक या प्रक्रियेत प्रामाणिकपणे सहभागी झाले ? मुलांना त्याचा काय लाभ झाला ? याची उत्तरे कोण देणार ? सगळीच जबाबदारी सरकारची,मग तुम्ही काय करणार ? आहात कशासाठी ? सुदैव समजा की तुम्ही चाळीस वर्षापूर्वीचे गरीब बिचारे मास्तर नाही आहात.गाव खेड्यात रहावे लागणारे,मैलो न मैल सायकलवरून किंवा पायपीट करीत तुटपुंज्या पगारावर कर्तव्य बजावणारे,सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसणारे,पायात करोनाच्या स्लीपर आणि अंगात जाड्याभरड्या नागमणी कपडयांच्या दोन जोडावर दिवस काढणारे.पण ज्ञानदानाचे कर्तव्य निष्ठापूर्वक बजावणारे मास्तर.ते दिवाळी-उन्हाळीच काय,रविवार आणि सणवारांच्याही सुट्या घेत नसायचे.तुम्हाला दाबून पगार आहे.कामाच्या ठिकाणी राहायची सक्ती नाही.तुम्ही दुचाकी (अपवादात्मक) चारचाकी (बहुतेक सर्व ) वाहनातून फिरता.दोन तीन हजाराची खेटरं पुजता.पाच-पाच हजारांचे कपडे,इंपोर्टेड बनियान-अंडरपॅन्टी,खायला काळ.आणखी काय काय गुणवर्णन करावे आपले.सांगावे ते कमीच आहेत.असे असताना आपणाला शिक्षकपणाची लाज वाटावी हे भयंकरच नाही का ? बरे सरकार तुम्हाला बराशी खोदायला,खडी फोडायला तर नाही सांगत.शाळेत हजर रहा.कोरोनामुळे मुलांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढा.या वर्षीची दिवाळी जरा साधेपणाने साजरी करा.चंगळ जरा कमी करा.पाचच दिवसांची सुटी घ्या.किमान पन्नास टक्के कामकाज करा म्हणून सांगतेय.तर त्याला तुमचा असहकार.काय प्रॉब्लेम काय आहे.तुमचा सुटीचा हक्क.आरे जरा तुमचेच विद्यार्थी असणाऱ्या मुलांच्या आईबापांकडे पहा.त्यात शेतकरी आहेत,मजूर आहेत,कामगार आहेत.त्यांचे हाल पहा.त्यांना कुठे आहेत सुट्या.नाहीत ना.मग तुम्ही काय सरकारचे जावई आहात की हत्तीच्या कानातून उतरले आहात.सगळं जग काम हवे म्हणून तळमळतंय आणि तुम्हाला सुट्या हव्यात होय रे ‘कपी’पुत्रांनो !  तो कपिल पाटील टोप्या फेकतो आणि तुम्ही त्या डोक्यात घालून नाचताय.मनाची नाही निदान जरा जनाची तरी बाळगा.जरा जास्त काम केलेत तर मराल काय ? 

4 thought on “मास्तरड्यानो जरा जास्त काम केलेत तर मराल काय ?”
 1. शिक्षकांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल जाहिर निषेध

 2. This brings shame to all the REAL JOURNALISTS. What language! Ridiculous.
  Journalists are taught to write being unbiased and to study the topic before putting down on paper, your editorial (which is not an editorial but looks like a personal letter, full of abuse language) is so biased, so baseless, so shameful, it just doesn’t suit in any newspaper. Looks like you are desperate to make a controversy to make your newspaper sell somehow, but Writing About Teachers in such a low level of language is really pathetic!
  Apologize publicly, and hire a Good Editor for Journalism’s sake.

 3. ” शर्मसार हो गईं हैं कलम आज,
  रुसवा हो गए है सारे अल्फ़ाज,
  जिन्होंने सिखाये कलम को लब्ज,
  कलम ने बेशर्मी से उतरी है लाज ।”

  शर्म की बात है कि पत्रकार होकर भी इन एडिटर महोदय ने उस कदर के भाषा का इस्तेमाल करना याने कलम ने अपना लिहाज भूल जान। इस तरह के पत्रकार सिर्फ अपने पेशे पर दाग है । इस बात पे कह सकते है है की जब किसी की कॉपी करने जाए तो मुकी खानी पड़ती है। और ये लेख तो एक बड़े अखबार की कॉपी करने का प्रयास है। लेकिन फिर भी उनकी भाषा लहज़े में होती है ।
  एडिटर साहब, अगर आपका अखबार बिक नही रहा है तो दूसरे रास्ते अपनाइये, किसी और पर यू कीचड़ उछालने से आप खुद ही काले होनेवाले है । कलाम को धार लगाइये ताकी अगली बार आपके ख़बर से अखबार चलेगा । आपको ऐसे मदारी के खेल करने की जरूरत नही पड़ेगी।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *