टर्न ऍन्ड टाऊन व नॅशनल जॉग्रफिक यांनी घेतलेल्या आंतरराष्ट्रीय छायाचित्रांच्या स्पर्धेत औरंगाबादच्या बैजू पाटील यांना आऊटस्टँडिंग फोटोग्राफर २०-२० हा पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाले आहे. हा पुरस्कार खूप प्रतिष्ठेचा मानला जातो. उत्कृष्ट छायाचित्रकार असलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. लवकरच या पुरस्काराचे वितरण   बैजू पाटील यांना करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत फॅशन, वेडिंग, स्पोर्ट्स, फाईन आर्ट, वाइल्ड लाईफ आदी अन्य एकूण दहा वेगवेगळ्या विभागांमध्ये घेतली होती. जगातील दहा विख्यात व तज्ञ छायाचित्रकार या स्पर्धेसाठी परीक्षक होते. जगभरातुन तब्बल पंचेचाळीस हजार छायाचित्र स्पर्धेसाठी आले होते. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये ज्यांनी उत्कृष्ट व सातत्यपूर्ण काम केले आहे. अशा विलक्षण छायाचित्रांमध्ये पारंगत असलेल्या रियल हिरो व आर्टिस्ट यांनाच या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. त्यापैकी बैजू पाटील हे एक.  
बैजू पाटील हे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. मागील सत्तावीस वर्षांपासून ते वन्यजीव प्राण्यांचे व पक्ष्यांचे छायाचित्रे काढताहेत. त्यांचा याबद्दलचा अभ्यास देखील तेवढाच सखोल आहे. आतापर्यंत एकूण १३६ आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. आपल्या छायाचित्रांमध्ये नवनवीन प्रयोग करतात व स्वतःचा जीव धोक्यात घालून; ते वन्यजीवांचे अत्यंत दुर्मिळ असे क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपत असतात. वर्ल्डकप फोटो कॉन्टेस्ट पदक मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. तसेच जगभरातील प्रख्यात रॉयल अर्बट हॉल, लंडन येथे त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरले होते व नुकताच नॅशनल जॉग्रफिक त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. या स्पर्धेसाठी त्यांची उत्कृष्ट पंधरा छायाचित्रे मागवण्यात आले होते. हा पुरस्कार मिळाल्याने मला फार आनंद झाला असल्याचे, बैजू पाटील म्हणाले. सध्या ते एका नामांकित कॅमेरा कंपनीचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम पाहताहेत व स्वतः फोटोग्राफीचे शिक्षण देखील देताहेत.


*फोटो चौकट:*हा फोटो राजस्थान येथील भरतपूर पक्षी अभयारण्यात काढलेला आहे. मागील पाच वर्षांपासून या छायाचित्रासाठी ते वाट बघून होते. हिवाळ्यात इथे प्रचंड कडाक्याची थंडी पडते.  ही माकडं दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात.  संध्याकाळी जसजशी थंडी वाढेल तशी एकमेकांचा आधार घेत एकमेकांना चिटकून ऊब घेत थंडीचा सामना करतात व सकाळी ऊन पडल्यावर वेगळी होतात. हे छायाचित्र सकाळी सहा वाजताचे काढलेले आहे. फोटो काढताक्षणी केवळ टोळीचा मोरक्या जागा होता व सगळी माकडं एका झाडाच्या फांदीवर रांगेत शांतपणे झोपलेली होती. अशी एकूण १५ छायाचित्रे या स्पर्धेत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *