परतुर / एम एल कुरेशी.परतूर तालुक्यात ओला  दुष्काळ जाहीर करण्यासाठी आणखीन एका आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल अशी माहिती परतूर तहसील कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे, परतूर तालुक्यात झालेल्या  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आणखीन एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागेल, या संदर्भात लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळण्याची गरज असताना शासना कडून  मागणीपेक्षा निम्मिच रक्कम प्राप्त झाली असल्याने, सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात निम्मीच  रक्कम जमा होणार असल्याची माहिती परतुर तहसील कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे, मंठा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची रक्कम शेतकरयांच्या खात्यात जमा झाल्याने परतूर तालुक्यातील शेतकर्‍यात चलबिचल सुरू झाली आहे, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीत परतूर तालुक्यातील शेतकरयांच्या खात्यात  पैसे वर्ग करण्याचे  काम वेगाने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात निम्मीच  जमा होत असून अनखीन निम्मी रक्कम जमा होण्यासाठी किमान एक आठवडा तरी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे, तालुक्यात अतिवृष्टीमुळे 33%  क्षेत्र बाधित झालेले असून, एकूण 65120, हेक्‍टर क्षेत्रातील 51897, शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे, यासाठी परतुर तहसील कार्यालयाने शासनाकडे सदतीस कोटीची मागणी केली होती, परंतु मिळाले प्रत्यक्षात 19 कोटी रुपये  प्राप्त झाल्याने, या रकमेचे वाटप केले जाणार आहे, याची तयारी सध्या वेगाने सुरू आहे,एका आठवड्यात  शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे तहसील कार्यालयातील अधिकारयां कडून अशी माहिती मिळाली आहे, म्हणजे शासनाने घोषित केलेल्या हेक्टरी नुकसान भरपाईचे सध्या निम्मे पैसे शेतकऱ्यांना मिळतील व त्यानंतर दुसऱ्या हप्त्यात निम्मी रक्कम जमा होणार आहे. विमा कंपन्या, तसेच केंद्र सरकारची मदत केव्हा मिळणार याची कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र दिसत आहे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सवने  यांनी  तालुक्यात शासनाने ओला दुष्काळ  जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नुकसान भरपाईची रक्कम टाकण्यात यावी, म्हणून परतूर येथे सतत 21 दिवस बेमुदत लाक्षणिक उपोषण करून शासनाला मदत देण्यास भाग पाडले, राज्य शासनाने काही प्रमाणात मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देत  पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली आहे, परंतु केंद्र शासनाने अद्याप कोणतीच मदत शेतकऱ्यांना जाहीर केली नसल्याने, याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून केंद्र शासनाला शेतकऱ्यांची मदत करण्यास भाग पाळण्याची आवश्यकता असल्याचे शिवाजीराव सवने  यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *