पैठण / प्रतिनीधी पैठन तालुक्यातील ढोरकीन येथील औरंगाबाद – पैठण मुख्य रस्त्यालगत असलेल्या बस थांब्याजवळील मुख्य बाजारपेठेत असलेले इंडीया १ कंपणीचे एटीएम मशिनच अज्ञात चोरट्यांनी ओढून नेत पळवून नेले आहे.शेजारील दुकानदारांना काल शुक्रवारी पहाटे हि बाब लक्षात येताच त्यांनी एटीएम असलेल्या ठिकाणी पाहिले असता तेथील एटीएम मशीनच गायब झालेले दिसून आले.या घटनेची माहीती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे,पैठण औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरिक्षक अर्चना पाटील, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल आयटवार,पोहे काँ.सतिष राऊत,पोहे काँ.तुकाराम मार्कळ,पोहे काँ.एकनाथ मोरे, बिट जमादार राजेश चव्हाण आदी पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.त्यांनी एटीएम ओढत नेलेल्या रस्त्याने माग काढत एटीएम मशीन शोधून काढन्याचा खुप प्रयत्न केला.दरम्यान श्वान व ठसे पथक आले असता या पथकासही कुठलाच सुगावा लागला नाही.काही दिवसांपूर्वीही आशिच घटना येथे घडली होती.या घटनेला काहीसा विसर पडताच पुन्हा याच घटनेची पुनरावृत्ती येथे घडली आहे. या काल घडलेल्या घटनेचा उशिरापर्यंत तपास व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *