कन्नड /कल्याण पाटील कन्नड तालुक्यातून शिऊर बंगला ते भराडी रस्त्याचे काम कल्याण टोल कंपनी करीत आहे त्यांनी निंभोरा- तपोवन प्रकल्पाचा उजवा कालवाच गायब केला आहे तर अंबाडी प्रकल्पाचा कालवा धुळे सोलापूर महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकोन कंपनीने जागोजागी गायब केल्याने पाटबंधारे विभागाचे करोडो रुपयाचे नुकसान झाले आहे तर शेतकरी धरण भरलेले असताना धरण उषाशी शेतकरी पाण्यावाचून उपाशी राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे . याबाबत पाटबंधारे उपविभागातील अधिकारी गप का बसले याबद्दल तालुक्यातील शेतकऱ्यांत चर्चा रंगली आहे.    शिऊर बंगला ते भराडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे हे काम करनारी एजन्सी कल्याण टोल कंपनीने निंभोरा तपोवन प्रकल्पाचा ८ की मी चा उजवा कालवा तपोवन ते देवपुळ गेलेला आहे या प्रकल्पावर पाटबंधारे विभागाचे अभियंता , शाखा अभियंता , कालवा निरीक्षक , शिपाई एव्हडे असताना वासडी ते मेहेगाव च्या मध्ये हा कालवा या रस्त्यामधून गेलेला आहे तो संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने सपाट करून टाकला आहे या कालव्याच्या पाणी क्षेत्रात परिसरातील सुमारे दोनशे शेतकरी येतात ते सिंचना पासून वंचित राहणार आहेत . विशेष म्हणजे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना याची माहितीच नाही कारण कोणताच अधिकारी कर्मचारी या प्रकल्पावर येतच नाही कालवा निरीक्षक , शाखा अभियंता म्हणतात आम्हाला माहीत नाही . फक्त सोमवारी कन्नड येथे चक्कर मारून निघून जातात असे शेतकऱ्यांनी सांगितले तर अंबाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचेही हीच गत झालेली आहे याबाबत उपविभागीय अभियंता भावठाणकर यांना विचारले असता त्यांनी ही कबूल केले की मला शाखा अभियंता व कालवा निरीक्षक यांनी माहितीच दिली नाही मला माहित नाही मी आजच कर्मचारी पाठून माहिती घेतो तर अंबाडी प्रकल्पाच्या कालव्याचे दिलीप बिल्डकोन कंपनीने सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान केले आहे त्यांना ईस्टीमेन्ट ही दिलेले आहे अद्यापही काम केले नसल्याचे सांगितले मात्र संबंधित एजन्सी विरुद्ध कारवाई का नाही केली असे विचारताच गप झाले मात्र दोन्ही कालवे गायब झाल्याने शेकडो हेक्टर शेती सिंचनापासून वंचित राहिली आहे हे मात्र सत्य आहे याबाबत शाखा अभियंता जारवाल यांना विचारले असता मला माहीत नाही माहिती घेतो असे सांगितले तर कालवा निरीक्षक पांचोले यांनी सांगितले की मी आज जाऊन पाहतो मी तिकडे गेलोच नसल्याने किंवा शिपायाने मला कळवले नसल्याने  आज पाहतो असे सांगितले .धरणाचे कालवे बुजत असताना पाटबंधारे उपविभागाचे कर्मचारी. काय करत होते ? र्म

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *