मुंबई /प्रतिनिधी
अर्णब गोस्वामी कुठला माणूस आहे मला माहिती नाही.पण मी तर महाराष्ट्राची मराठी मुलगी आहे ना .पत्रकार आहे म्हणून त्याला कोणताही गुन्हा करण्याची मुभा आहे का.त्याने फसवल्या मुळे माझे पती अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली.मला न्याय मिळणार आहे की नाही.असा सवाल अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.अर्णब गोस्वामीने माझ्या नवऱ्याची आर्थिक फसवणूक केली.कामाचे पैसे बुडवले.पैसे मिळाले असते, तर माझा नवरा आज जिवंत असता. अर्णब गोस्वामी हा राक्षस आहे,असे अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.अन्वय नाईक आत्महत्या रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आल्यानंतर अक्षता नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.तीन लोकांची नावे माझ्या नवऱ्यानं सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती.त्यात प्रणब गोस्वामींचा उल्लेख होता.प्रणब गोस्वामीच या व्यवहाराचा प्रमुख जबाबदार होता.त्यानेच पैसे देण्यास नकार दिला.वरतून धमक्याही दिल्या.त्याला कंटाळून माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली.गेली पाच वर्ष त्यावर कारवाई झाली नव्हती.आता झाली आहे तर मला न्याय मिळावा या साठी आपण मदत करा.असे अक्षता नाईक यांनी म्हटले आहे.
=====================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *