मुंबई /.प्रतिनिधी
अर्णब गोस्वामींची अटक पत्रकार म्हणून नव्हे तर आर्थिक फसवणूक आणि आत्महत्येला कारण ठरल्याच्या आरोपावरून करण्यात आलेली आहे.असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे .अर्णब गोस्वामी यांनी एका प्रकरणात ठरवण्यात आलेला    व्यवहार पूर्ण केला नाही.त्यामुळे संबंधिताने आत्महत्या केली.आत्महत्या केलेल्या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये स्पष्टपणे अर्णब गोस्वामींचा उल्लेख केलेला आहे.हे प्रकरण पाच वर्षापूर्वीचे असले तरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या विनंतीवरून आणि न्यायालयाच्या आदेशाने री ओपन करण्यात आलेले आहे.अर्णब गोस्वामीला झालेली अटक याच अनुषंगाने आहे.असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.ही कारवाई राजकीय आकसबुद्धीने नाही.अर्णब गोस्वामींच्या कोणत्याही बातमी किंवा वार्तांकनाचा या अटकेशी संबंध नाही,त्यामुळे पत्रकाराची किंवा माध्यमांची यात कोणतीही गळचेपी करण्यात आलेली नाही असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.ही कारवाई सरकारने नाही तर पोलिसांनी केलेली आहे असेही अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीला अटक केल्यानंतरभाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करताना अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण आर्थिक फसवणूक आणि आत्महत्येला कारणीभूत ठरल्याच्या गुन्हेगारीशी संबंधित आहे,असे देशमुख म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *