नुकत्याच TRP घोटाळ्याचे दुःख अजून संपले नाव्हतेहे कि अर्णब ला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सोमवारी नापसंती व्यक्त केली.अर्णब गोस्वामी यांची पत्रकारितेची भाषा व शैली नीट नाही
पत्रकारिता हे जबाबदारचे काम आहे. ‘‘जनहिताच्या नावाखाली याआधी कधीही या स्तरावरून वक्तव्ये करण्यात आली नव्हती’’, व अर्णब स्वतः च्या वैयक्तिक स्वार्थासाठी इतर लोकांना भडकावून देण्याचे काम करत आहे मुद्धामून भडकाऊ वक्तव्ये केल्याबद्दल रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध नोंदवण्यात आलेल्या दोन एफआयआरच्या तपासाला स्थगिती देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने केलेल्या अपिलाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील ए. एम. सिंघवी यांनी उच्च न्यायालयाच्या ३० जूनच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही लोक कायद्यापेक्षा मोठे असल्याचा संदेश जाऊ नये, असे ते म्हणाले. त्यावर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे मत नोंदवले.
‘कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, मात्र काही लोकांना अधिक तीव्रतेने लक्ष्य करण्यात येते. काही लोकांना मोठय़ा प्रमाणावर संरक्षण देण्याची अलीकडची संस्कृती आहे’, असे न्या. धनंजय चंद्रचूड व एल.एन. राव यांचाही समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले..