दरम्यान शिवराळश्री शिवीगाळ प्रकरणी शिवराळश्री यांनी स्वतःहून विसंवाद झालेल्या पालकांशी मध्यस्थामार्फत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न चालवला असून तो प्रत्यक्ष होण्याआधीच आमचा वाद मिटला असल्याची पोस्ट पालक समितीच्या ग्रुपवर अन्य व्यक्ती मार्फत टाकण्याचा गनिमी कावा देखील शिवराळश्री यांनी केला.इतकेच नाही तर आपण शाळेचे डायरेक्टर नसल्याची कबुली देत,मी तसे अनावधानाने बोलून गेलो. आता मी तुमच्या सोबत असल्याचे पालकांना पटवण्याचा प्रयत्न केला .त्याच बरोबर पालकांना शिवीगाळ केल्याबद्दल अग्रलेखातून खडे बोल सुनावले म्हणून दैनिक लोकपत्र आणि कार्यकारी संपादकांचा विकृत या संबोधनाने उल्लेख करण्याचा उद्दामपणाही शिवराळश्री यांनी एका पाल्ककांशी बोलताना दाखवला आहे.झाल्या प्रकाराबद्दल एका शब्दानेही दिलगिरी किंवा माफी न मागता शिवराळश्री यांना पालकांकडून वाद मिटल्याची आणि त्या दिवशीच्या शिवीगाळीवर काही आक्षेप नसल्याची,तसेच हा आपसातील मामला असल्याची क्लीनचिट पालकांकडून हवी आहे.शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे,पालकांनी या संदर्भात सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यामुळे,ते ज्या पक्ष-संघटनेत काम करतात तिकडेही या विषयावर उहापोह चालू असल्याने,तसेच शिवराळश्री ज्या संस्थेत नोकरी करतात तिकडेही पालकांची तक्रार पोहचल्याने,शिवराळश्री सध्या चांगलेच दुध्यात सापडले आहेत.
(ता.क :प्रवाद टाळण्यासाठी बातमीत संबंधितांची नावे वगळली आहेत)Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *