नागपूर /प्रतिनिधी
नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणतील.शेतकरी आपल्या मर्जीने आपल्याला परवडणाऱ्या भावात आपला माल खुल्या बाजारात कोणालाही विकू शकेल अशा गर्जना करणाऱ्या मोदींच्या खोटारडेपणाचा पुरावा विदर्भात मिळाला आहे.सोयाबीनला सरकारी हमीभाव ३८८० रुपये असताना मोदींनी सांगितल्या नुसार थेट व्यापाऱ्यांना माल विकण्याच्या नादात सोयाबीन उत्पादक शेतकरी आतबट्ट्यात आले असून सोयाबीनला फक्त २८०० रुपये प्रति क्विंटल भाव देऊन कृषी उत्त्पन्न समित्यांच्या बाहेर खुल्या मार्केट मध्ये व्यापारी शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत.पूर्वी आत असणारे व्यापारी आणि दलाल आता बाहेर येउन भररस्त्यात शेतकऱ्यांना लुटत आहेत.मोदींच्या नव्या कृषी कायद्यांचा हा असर आहे.या मध्ये शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १००० रुपयांचा तोटा होत आहे.भिवापूर उमरेड भागातील शेतकऱ्यांनी या बाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *