मुंबई /प्रतिनिधी
एका दिवसाची,नव्हे काही तासांची सुद्धा उसंत न घेता सातत्याने कार्यरत राहणाऱ्या शरद पवार साहेबांच्या क्रेयशक्तीला त्रिवार हॅट्स ऑफ.अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल मनपूर्वक आदर व्यक्त केला आहे.कोणत्याही व्यक्तीशी बोलताना शरद पवार साहेब पूर्वग्रह ठेवत नाहीत.मनाचा मोठेपणा दाखवतात.जिथे सर्वसामान्यांना न्याय देण्याचा आणि जनहिताचा प्रश्न असतो तिथे राजकीय आडाखे बाजूला ठेऊन मनाचा मोठेपणा दाखवतात.मी लहानपणापासून पहात आलेली आहे,आजही पहात आहे.ते कायम कार्यमग्न असतात.त्यांचे सर्वांवर बारकाईने लक्ष असते,अभ्यास असतो,कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक करताना ते त्यासंबंधी दुरोगामी परिणामांचा तपशिलासह विचार करतात.गतीने निर्णय घेतात.पक्ष,भूमिका,राजकारण वेगळे पण मला माझ्या वडिलांनी चांगल्या व्यक्तींचा आदर करायला शिकवले आहे.चांगल्याला चांगलेच म्हणायला सांगीतलेले आहे.पवार साहेब माझ्यासाठी आदरणीय आणि चांगले व्यक्ती आहेत असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.काल त्यांच्याशी माझी वसंदादा पाटील शुगर इंस्टिट्यूट मध्ये भेट झाली.ऊसतोड मजूर आणि वाहतूकदारांचा विषय होता.पवार साहेबानी आमची बाजू आस्थेवाईकपणे ऐकून समजून घेतली आणि चुटकीसरशी सकारात्मक निर्णय घेतला.त्यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसला.आज ते नाशिक दौऱ्यावर असून कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढायला गेले आहेत.कोल्हापूरच्या महापुराच्या वेळी ते सर्वात आधी तिथे पोहचले होते.अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांच्या भेटीलाही ते नेटाने फिरले.कोरोनाकाळातही ते इतके काम करतात.त्यांना हॅट्स ऑफ असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.माझ्या वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर झालेल्या बीडच्या मध्यावधी लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला नव्हता याचीही आठवण पंकजा मुंडे यांनी दिली आहे.कालच्या बैठकीत पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समवेत शरद पवार काहीकाळ हास्यविनोदातही रमलेले दिसले.ही काही नव्या राजकीय समीकरणांची रुजुवात तर नाही ना ? अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *